वीरेंद्र जगताप यांची विधानसभेत मागणी : भूमिगत विद्युत लाईन सुरू करावीअमरावती : पुनर्वसित गावातील विद्युत पुरवठ्याकरिता स्वतंत्र एक्सप्रेस फिडर कनेक्शन, विद्युत लाईन त्वरित भूमिगत करण्यात यावी, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत आ़वीरेंद्र जगताप यांनी केली आहे़सध्या मुंबई येथे राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून धामणगाव विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यांतील अनेक समस्यांचा पाठपुरावा या अधिवशेनात आ़वीरेंद्र जगताप यांनी केला आहे़ गतवेळी त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे मंगरूळ दस्तगीर येथील १०़३३ कोटी रूपयांच्या पेयजल योजनेला मंजुरी मिळाली आहे़ जीवन प्राधिकरणामार्फत येथील कामाला लवकरच सुरूवात होणार आहे़ या भागातील चिंचपूर या पुनर्वसित गावांतील विद्युत पुरवठ्याकरिता स्वतंत्र एक्सपे्रस फिडर कनेक्शन बसविण्यात यावे, दत्तापूर येथील ११ के.व्ही.मंगरूळ फिडर विद्युत लाईन भूमिगत करण्यात यावी, यांसह अनेक प्रश्न आ़वीरेंद्र जगताप यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मांडली आहेत़ (प्रतिनिधी)
पुनर्वसित गावाला स्वतंत्र एक्सप्रेस फिडर द्या
By admin | Published: March 25, 2017 12:15 AM