गणेश वासनिक ।आॅनलाईन लोकमतअमरावती : चंदन झाडाची माहिती आणि स्थळांचा शोध घेण्यासाठी तस्करांनी एजन्ट नेमले आहेत. ‘चंदन झाडाची माहिती द्या अन् दोन हजार मिळवा’ अशी योजनाच असल्याचे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सूत्रांकडून मिळाली आहे.अमरावतीसह जिल्ह्यात चंदनाची झाडे तोडून नेल्याच्या घटना उजेडात येत असतात. मात्र, अत्यंत सुरक्षित ठिकाणी असलेली चंदनाची झाडे चोरून नेण्यात तस्कर कसे यशस्वी होतात, हा संशोधनाचा विषय आहे. जिल्हा व सत्र न्यायधीश, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक, महापालिका आयुक्त, उपवनसंरक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या शासकीय बंगल्यातून चंदनाची झाडे चोरून नेली आहेत. याप्रकरणी पोलिसांत तक्रारसुद्धा नोंदवली आहे.चंदनचोरांनी झाडाची अचूक माहिती मिळविण्यासाठी एजन्ट नेमले आहेत. चंदन झाडाची माहिती दिल्यास संबंधितांना दोन हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते. ‘दिवसा माहिती मिळताच रात्रीला मोहीम फत्ते’ असा गोरखधंदा काही वर्षांपासून सुरू आहे. चंदन तस्करांसोबत काही वनकर्मचाऱ्यांचे हितगूज असल्याचेदेखील बोलले जाते. सोन्यापेक्षाही भाव मिळत असल्याने काही समुदायाचे लोक चंदन झाडे चोरण्यात आघाडीवर आहेत. बाजारपेठेत चंदनाच्या परिपूर्ण झाडाला एक ते दीड कोटी रुपये मिळत असल्याची माहिती आहे. मात्र, त्याला ६० ते ७० वर्षांचा कालावधी लागतो. त्याचा सारासार विचार न करता भरमसाठ पैशांच्या लोभातून चंदनचोरांचा धुमाकूळ सुरू आहे.मुंबई, दिल्ली, बंगळुरु येथे बाजारपेठचंदन झाडांची चोरी करून त्यातील गाभा हा मुंबई, दिल्ली व बंगळुरू येथील बाजारपेठत विकला जात असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात अमरावती, परतवाडा आणि वरूड असे चंदन झाडांच्या चोरीचे कनेक्शन आहे.आवाजविरहित यंत्राचा वापरचंदन झाडांची चोरी करताना चोरट्यांकडून आवाजविरहित यंत्रांचा वापर केला जातो. ही मोहीम रात्रीच्या वेळी फत्ते होत असल्याने यात बंगल्यातील सुरक्षारक्षकांचीदेखील महत्त्वाची भूमिका राहते, असे सूत्रांनी सांगितले.चंदन झाडे चोरणारी गँग असल्याची माहिती आहे. त्यांना जेरबंद करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची मदत घेतली जाईल.- हेमंत मिणाउपवनसंरक्षक, अमरावती.
चंदनाच्या झाडाची माहिती द्या अन् दोन हजार मिळवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:39 PM
चंदन झाडाची माहिती आणि स्थळांचा शोध घेण्यासाठी तस्करांनी एजन्ट नेमले आहेत.
ठळक मुद्देचोरट्यांची बक्षीस योजना : एजन्ट नेमले, शासकीय बंगले ‘टार्गेट’