लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाचे कमी पर्जन्यमान व पेयजल, सिंचन, चारा उपलब्धता आदी स्थिती लक्षात घेऊन टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी सांगितले. शनिवारी त्यांनी उपस्थित अधिकाºयांशी चर्चा करून जिल्ह्यातील विविध बाबींची स्थिती जाणून घेतली.जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीबरोबरच चारा उपलब्धतेसाठी वैरण विकास कार्यक्रमासारख्या योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला नेमून दिलेल्या जबाबदाºया निश्चित करून उद्दिष्टे पूर्ण करण्यावर भर द्यावा. प्राप्त निधी मुदतीत खर्च व्हावा, असे देशमुख म्हणाले. चिखलदराच्या गटविकास अधिकारी तथा परिविक्षाधीन आयएएस अधिकारी मिताली सेठी यांच्याकडून त्यांनी चिखलदरा व मेळघाटातील स्थितीबाबत माहिती घेतली. जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासह मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी काटेकोर कार्यक्रम, रोजगारनिर्मिती, वीजपुरवठा, संपर्क यंत्रणा आदींसाठी प्रयत्न करू, असेही जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले. यावेळी प्र-अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, राम लठाड, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, पालकमंत्र्यांचे स्वीय सचिव अनिल भटकर, नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, माळवे, यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळी कामांना प्राधान्य देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 10:05 PM
यंदाचे कमी पर्जन्यमान व पेयजल, सिंचन, चारा उपलब्धता आदी स्थिती लक्षात घेऊन टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी सांगितले.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : अधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान केले स्पष्ट