लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पीक विमा कंपनीने गतवर्षीच्या खरिपात नाकारलेल्या पूर्वसूचना पुन्हा तपासून बाधित शेतकऱ्यांची यादी कृषी विभागास त्वरित सादर करा. धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या पूर्वसूचनांची फेरतपासणी करून १५ दिवसात शेतकऱ्यांना परतावा देण्यात यावा, अन्यथा कंपनीवर एफआयआर नोंदविण्याची तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोसरे, कृषी विकास अधिकारी, व्यवस्थापक, अग्रणी बँक अमरावती, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, संबंधित अधिकारी, पीक विमा कंपनीचे अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
खरिपातील खते व बियाणे नियोजनाच्या अनुषंगाने बडनेरा रेल्वे रेक पॉइंटमध्ये खताची रेक लागल्यावर त्याला प्राधान्य देण्याविषयी जिल्हाधिकारी कटियार यांनी रेल्वे प्रशासनास निर्देश दिले. प्राप्त होणाऱ्या खताच्या किमान ३० टक्के युरिया व डीएपी बफर स्टॉकसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी खत कंपनीला दिल्या आहेत. धामणगाव तालुक्यातील पीक विम्याचे घबाड समोर आले आहे. जिल्ह्यातही असे प्रकार घडल्याची शक्यता असल्याचे चिंचपूरचे शेतकरी अभिजीत लांबाडे म्हणाले
ऑफलाइन सर्व्हे अर्जावर शेतकऱ्यांच्या खोट्या सह्यासोयाबीन, कपाशी पिकासाठी चिंचपूर, तुळजापूर, बहाणपूर येथील शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या सव्हें फॉर्मवर कंपनीच्या प्रतिनिधीद्वारा खोट्या सह्या मारल्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृष् कृषी विभागाकडे केलेली आहे. पवन लांबाडे, राहुल बांबल, अभिजित लांबाडे, पवन निकम, महेंद्र गायकवाड, सोमेश्वर ठाकरे आदी शेतकरी बैठकीदरम्यान उपस्थित होते.
आठ दिवसात भरपाई द्या, जिल्हाधिकाऱ्यांची तंबीऑनलाइन सव्र्व्हेमध्ये ७५ ते ८० टक्के नुकसान दाखवले असताना ऑफलाइन सव्हें फॉर्मवर प्रतिनिधीने शून्य ते पाच टक्के असे नुकसान दर्शवून भरपाईपासून वंचित ठेवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आठ दिवसात भरपाई न मिळाल्यास कंपनीवर एफआयआरचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
चुकीचे पंचनामे व अहवालाने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेवर विश्वास राहिलेला नाही. जिल्ह्यात एक रुपयांमध्ये जरी पीक विमा योजना असली तरी फक्त ६० ते ७० टक्केच विमा निघत आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे.-पुष्पक खापरे, शेतकरी प्रतिनिधी, जिल्हा समिती