मागणी : गैरसोयींमुळे प्रवाशांची होतेय गैरसोयलोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्याचे ठिकाण असलेल्या तिवसा येथे युती सरकारच्या काळात तिवसा बसस्थानकाचे उद्घाटन झाले होते. मान्यता आणि उद्घाटनाशिवाय हे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे युकाँने याच मागणीसाठी मोझरी बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री प्रवीण पोटे, खा.आनंदराव अडसूळ, आमदार यशोमती ठाकूर, परिवहन विभागीय नियंत्रक राजेश आडोकार यांना निवेदन देऊन तिवसा बसस्थानकाला आगाराचा दर्जा देण्याची मागणी रेटून धरली. तिवसा तालुक्याचे ठिकाण असून तिवसा शहर अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे. तिवसा शहरात सर्वच शासकीय कार्यालये, बाजारपेठ असून शाळा, कॉलेजमध्ये दररोज हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातून ये-जा करतात. मात्र, येथे ग्रामीण भागात एसटी सेवा नसल्याने विद्यार्थी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तिवसा बसस्थानकाला १२ एकर हक्काची जागा असून येथे आगाराची अत्यंत आवश्यकता आहे. आगाराचा दर्जा दिल्यास विविध समस्यांपासून प्रवासी व नागरिकांची सुटका होणार असल्याने तत्काळ तिवसाला आगाराचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना काँगेसचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देशमुख, माजी सभापती दिलीप काळबांडे, तिवसा पालिका उपाध्यक्ष वैभव वानखडे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके, लोकेश केने, पूजा आमले, मधुकर भगतसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
तिवसा बसस्थानकाला आगाराचा दर्जा द्या
By admin | Published: May 06, 2017 12:14 AM