लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कुठलाही इलाज उपलब्ध नसलेल्या आणि अत्यंत वेदनादायी मरण देणाºया ‘ग्लँडर्स’ या जिवाणूजन्य आजाराची लागण झालेल्या घोड्याला शासनाच्या विशेष आदेशानुसार ठार मारण्यात आले. घोड्यापासून या भयावह आजाराची लागण मनुष्याला होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले. जिवघेण्या ‘स्वाईन फ्लू’ या आजाराचा फास आवळलेला असतानाच ग्लँडर्सचे जिवाणू जिल्ह्यात आढळल्यामुळे तमाम नागरिकांनी विशेष सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.दर्यापूर तालुक्यातील अडुळाबाजार येथील घोड्याच्या रक्ताच्या नमुन्यात ‘ग्लँडर्स’ यारोगाची लागण आढळली आहे. त्याचा प्रादुर्भाव अन्यत्र होऊ नये म्हणून घोडे, गाढव, खेचर आदी अश्ववर्गीय जनावरांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी १ आॅगस्टला जारी केला आहे. दरम्यान ग्लँडर्स बाधित ‘त्या’ एका घोड्याला ३० जुलैला वेदनारहित मरण देण्यात आले.अश्ववर्गातील जनावरांना होणाºया ‘ग्लँडर्स’ या प्राणघातक आजाराची अडुळाबाजारमध्ये लागण झाल्याचे आढळल्यानंतर पशूसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला आहे. हा आजार माणसांनाही होत असल्याने जिल्ह्यातील सर्व अश्ववर्गीय जनावरांच्या रक्त नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. अश्ववर्गातील घोडा, गाढव, खेचरांना हा आजार होतो. अडुळाबाजार येथील घोड्याच्या रक्ताच्या नमुन्यात ग्लँडर्स या रोगाची लागण आढळल्याने यारोगग्रस्त जनावराच्या संपर्कातील माणसांनाही आजार होऊन त्यात मृत्यू होण्याची शक्यता असल्याने पशूसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. याजनावरांच्या वाहतुकीवर प्रतिबंध आणण्याचे आदेश जारी करण्यात आले असून त्याशिवाय आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.ग्लँडर्स रोग मानवासाठीही घातक आहे. वाहतूक बंदी आदेशानुसार अश्ववर्गीय जनावरांची जिल्ह्यातील वाहतूक, इतर जिल्ह्यांमधून होणारी वाहतूक, याप्राण्यांचे बाजार, शर्यती, पशूप्रदर्शन याठिकाणी ने-आण करण्यास देखील प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा प्रतिबंधात्मक आदेश ३१ आॅक्टोबरपर्यंत लागू राहिल, अशी माहिती जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ.मोहन गोहत्रे यांनी दिली.काय आहे ग्लँडर्सघोड्यांमधील हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा आजार गाढव, खेचर आणि उंट यांनाही होतो. माणसांनाही या आजाराची लागण होते. यामध्ये खालच्या जबड्याच्या हाडावर कठीण गाठ येते. नाकातून चिकट शेंबूड तारेसारखा लोंबत राहतो. नाकपुड्यांमधील पडद्यावर व्रण पडतात. पाय सूजतात. पायावर जागोजागी गाठी येतात व त्या फुटतात. हा आजार असाध्य असल्याने सरकारी नियमानुसार एखाद्या जनावरास हा रोग झाल्यास त्यास तज्ज्ञांची समिती नेमून भूल देऊन मारावे लागते. ग्लँडर्स हा जिवाणूजन्य आजार आहे. जनावरांपासून त्याचे संक्रमण माणसांना होते.ग्लँडर्सचे संक्रमण अन्यत्र होऊ नये यास्तव घोडे, गाढव, खेचर आदी अश्ववर्गीय जनावरांच्या वाहतुकीस मनाईहुकूम बजावण्यात आला आहे.- अभिजित बांगर,जिल्हाधिकारी, अमरावती.
‘ग्लँडर्स’बाधित घोड्याला मारले ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 11:11 PM
कुठलाही इलाज उपलब्ध नसलेल्या आणि अत्यंत वेदनादायी मरण देणाºया ‘ग्लँडर्स’ या जिवाणूजन्य आजाराची लागण झालेल्या घोड्याला शासनाच्या विशेष आदेशानुसार ठार मारण्यात आले.
ठळक मुद्देमनुष्याला संक्रमणाचा धोका : वैद्यकशास्त्रात इलाज नाही, सतर्कता महत्त्वाची