युवा एकता कला मंचचे सदस्य, आमदारांकडून प्रमाणपत्र
मोर्शी : स्थानिक युवा एकता कला मंचच्या सहा विद्यार्थी सदस्यांनी गुरगाव येथील संस्थेने आयोजित केलेल्या ऑनलाईन स्पर्धेतील योगासने या क्रीडाप्रकारात सहभागी होत विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
हरियाणाच्या गौरव इंटरनॅशनल स्पोर्ट्स ॲकेडमीने २१ फेब्रुवारी रोजी लार्जेस्ट ऑनलाईन मास टॅलेंट एक्सिबिशन ‘योगा’ या स्पर्धा आयोजित करण्यात आली. जागतिक पातळीवरील या स्पर्धेत अमेरिका, इंग्लंड, जपान, भूतान, व्हिएतनाम, भारत या सर्व देशांतील एकूण ४७७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. १५० भारतीय स्पर्धकांमधून मोर्शीतील पूजा शशीकुमार तट्टे, प्रांजली अजय दातीर, शौर्य शशीकुमार तट्टे, रोहन पुरुषोत्तम महल्ले, ओम काशीनाथ पंडागळे, कृष्णा काशीनाथ पंडागळे यांनी बाजी मारली. त्यांचे प्रमाणापत्र आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी युवा एकता कला मंचातील योगा शिक्षक नितीन प्रजापत, अध्यक्ष बंटी नागले, राहुल धुळे, विकी धोटे, त्रिशूल गेडाम, धनंजय अमझरे, रोहित नागले हे सर्व सदस्य शिक्षक तसेच पालक उपस्थित होते.