शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
2
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
4
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
5
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
7
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
8
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
9
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
10
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
11
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
12
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
13
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
14
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
15
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
16
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
17
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
18
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
19
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
20
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला

धामणगावच्या गोविंदांची गगनभरारी!

By admin | Published: September 05, 2015 12:19 AM

‘गोविंदा आला रे आला..’ च्या गजरात दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात ठिकठिकाणी दहीहंडी स्पर्धा साजऱ्या होतील.

जल्लोष : गाजविल्या १५० पेक्षा अधिक दहीहंडी स्पर्धा धामणगाव रेल्वे : ‘गोविंदा आला रे आला..’ च्या गजरात दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात ठिकठिकाणी दहीहंडी स्पर्धा साजऱ्या होतील. यातच धामणगाव रेल्वेसारख्या निमशहरी भागात सतत सराव चिकाटी व प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर जिल्ह्याच्या अनेक ठिकाणांवरून बक्षिसे मिळवून स्वत:च्या प्रयत्नावर आदर्श ग्रुपने शरीर सौष्ठवसारख्या स्पर्धेपासून ते दहीहंडी पथकापर्यंतची वाटचाल सुरू केली व विदर्भात लौकिक मिळविला आहे. समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा, या उद्देशाने शहरातील शिवचरण लसवंते या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने १० वर्षांपूर्वीपासून संस्कारित मुलांची एक फळी निर्माण केली़ युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता स्वत: सुदृढ शरीर बनवावे, या उद्देशाने आदर्श व्यायामशाळेत सर्वांनी एकत्र येऊन मुलांना घडविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातून शरीर सौष्ठव स्पर्धेत यश मिळविणारे आदर्श सदस्यसुदधा निर्माण झाले. यामध्ये स्वत: शिवचरण लसवंते, अजय मारवे, अंकुश ठाकरे, मनोज भुजबळ, राहुल राऊत, नीलेश आवारे, सागर शेंद्रे, शेैलेश वानखडे यांचा समावेश आहे. या संघटनेने अमरावती शहरातील राजकमल चौकात आयोजित दहीहंडी स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. परतवाडा येथील दहीहंडीचे प्रथम बक्षीस सलग या संघटनेने पटकावले. यानंतर विदर्भातील विविध जिल्ह्यातील दहीहंडी स्पर्धाही या संघटनेच्या गोविंदांनी पटकावल्या. कुटुंबातील आर्थिक परिस्थिती चांगली नसताना गोविंदा पथकाला मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतून या तरूणांनी ‘आदर्श कॅटरिंग सर्व्हिस’ सुरू केली. त्यातून अर्थार्जन सुरू केले. त्यांनी ढोलताशे, पथक, रक्तदान शिबिरे, महापुरूषाच्या जयंत्या-पुण्यतिथ्यांचे उत्सव यासारखे समाजोेपयोगी कार्यक्रम राबविले़ इतकेच नव्हे तर ‘आदर्श’च्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतसुध्दा दिली जाते. या मंडळाने सध्याच्या तरूणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जिद्द चिकाटी आणि महत्त्वाकांक्षेच्या बळावर या मंडळाच्या तरूणांनी यश संपादन केले आहे.