पौर्णिमेला कार्यक्रम : १० जुलै रोजी कौंडण्यपूरला दहीहांडी सोहळालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील सर्वाधिक प्राचीन व ४२४ वर्षाची परंपरा लाभलेल्या श्री क्षेत्र कौडंण्यपूर येथील देवी रूक्मिणीच्या पालखीला रविवारी पौर्णिमेला पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रूक्मिनी संस्थानमध्ये विशेष मान देऊन प्रवेश दिल्या जातो. संस्थानच्या वतीने देवी रूक्मिणीला नैवद्य अर्र्पित करण्यात येऊन अहेर केल्या जातो.आषाढीवारीसाठी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील देवी रुक्मिनीच्या पालखीने २९ मे रोजी प्रस्थान केले होते. गावागावांमधील स्वागत व पुजन स्विकारत पालखीचे अमरावतीला आगमण होताच आ. यशोमती ठाकूर यांनी आयोजित केलेल्या बियाणी चौकातील कार्यक्रमात महापौर, उपमहापौरांसह विभागीय आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत व पुजन केले होते. १ जुलै रोजी पालखीचे पंढरपुरात आगमन होताच उत्साहाने स्वागत करण्यात आले होते. आषाढी प्रतिपदेला म्हणजेच १० जुलै रोजी कौंडण्यपूर येथे दहिहांडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.श्री रुक्मिणी पीठात गुरूपौर्णिमा उत्सवकौंडण्यपूर येथील श्री रूक्मिणी विदर्भ पीठ येथे श्रीगुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ९ ते १२ भक्तिसंगीताचा कार्यक्रम, दुपारी गुरूपूजन ,गुरूदीक्षा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देवी रूक्मिणीला आज पंढरपुरात अहेर
By admin | Published: July 09, 2017 12:10 AM