शिक्षक बँक : सर्वसहमतीने पदाधिकाऱ्यांची निवडअमरावती : जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हाध्यक्ष तथा प्रगती पॅनेलचे नवनियुक्त संचालक गोकुलदास राऊत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शिक्षक सेनेचे पदाधिकारी सुनील केने यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. २१ सदस्यीय सभागृहात १५ संचालक असलेल्या प्रगती पॅनेलच्या संचालकांमधून अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडले जातील, हे स्पष्ट असताना आजची निवड केवळ औपचारिकता ठरली. अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे गोकुलदास राऊत आणि सुनील केने यांचेच नामांकन आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करुन अध्यक्षपदी राऊत आणि उपाध्यक्ष म्हणून केने यांच्या नावाची घोषणा केली. सहकारी संघटनेच्या संचालकाला उपाध्यक्षपद देऊन गोकुलदास राऊत यांनी समतोल साधला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीसाठी सोमवारी १ ते २ वाजेपर्यंत कार्यक्रम ठरविला होता. त्यानुसार दुपारी १ ते १.२५ या कालावधीत नामनिर्देशन स्वीकारले गेलेत. त्यानंतर ही प्रक्रिया पार पडली. सर्वसहमतीने निवडप्रगती पॅनेलच्या विजयाचे शिल्पकार शिक्षक समितीचे अध्यक्ष तथा पॅनेलचे प्रवर्तक गोकुलदास राऊत यांची अध्यक्षपदी सर्वसहमतीने निवड झाली, तर सहकारी संघटनेचे सुनील केने यांना उपाध्यक्षपद देण्यात आले. उपाध्यक्षपदासाठी अनेक दावेदार समोर आले होते. तथापि सुनील केने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. इतर संचालकांना सामावून घेण्यासाठी उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ प्रत्येकी वर्षभराचा राहणार असल्याची माहिती आहे. मतदारांनी आम्हावर जो विश्वास टाकला, त्याला कधीही तडा जाणार नाही. बँकच्या सभासदांसह सर्व संचालकांना विश्वासात घेऊन पारदर्शक कामे करण्यात येईल. - गोकुलदास राऊतनवनिर्वाचित अध्यक्ष, शिक्षक बँक.शिक्षक आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या या हक्काच्या बँकेची चौफेर प्रगती हेच आमचे ध्येय राहील. सर्व संचालकांना सोबत घेऊन कामकाज यशस्वीपणे करू. - सुनील केने,नवनिर्वाचित उपाध्यक्ष.
गोकुलदास राऊत अध्यक्ष केनेंवर उपाध्यक्षपदाची जबाबदारी
By admin | Published: November 24, 2015 12:15 AM