मोहन राऊत लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे: यंदा जिल्हाभरात सुरुवातीपासून चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोने खरेदीला जिल्ह्यात वर्षभर चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
अमरावती येथील सराफा बाजारात सोन्याचा दर ७५ हजार, तर चांदी ८९ हजार रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या अनेकांनी सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक चांगला भाव मिळत असल्याने मोडीत काढण्यास सुरुवात केली, तर काही जण भविष्यासाठी गुंतवणूक करीत आहेत.
५०० रुपयांनी वाढले दहा दिवसांत सोने गेल्या दहा पंधरा दिवसांपूर्वी सोने चांदीचा भाव ५०० रुपयांनी कमी होता. परंतु, आज सोन्याचा भाव ७५ हजार रुपये झाला आहे. म्हणजेच १० दिवसांत ५०० रुपयांची वाढ झाली.
लग्नसराईमुळे आणखी भाव वाढणार सध्या बाजारपेठेत सोने ७५ हजार, तर चांदी ८९ हजार रुपये आहे. परंतु, आगामी एप्रिल-मे महिन्यात लग्नसराईमुळे हे भाव आणखी वाढतील. त्यामुळे अनेकांनी आतापासूनच सोने-चांदी खरेदी करण्यावर भर दिला आहे.
एका वर्षात ५० टक्के वाढ सध्या सोने - चांदीच्या भावामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे अनेक जण बोलून दाखवत आहेत. वर्षभरात ५० टक्के वाढ झाली.
अनेकांचा खरेदीवर भर "सध्या सणोत्सव सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक सोने-चांदी खरेदी करण्यावर भर देत आहेत. यात विशेषतः वधू-वर पित्यांचा सोने-चांदी खरेदीवर अधिक भर आहे." - मनोज भगत, व्यापारी, धामणगाव रेल्वे
आणखी भाव वाढणार "आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने-चांदीचे दर वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे दरवाढ होत असून, आगामी महिन्यात हे भाव वाढण्याची शक्यता आहे." - संजय वर्मा, व्यापारी, धामणगाव रेल्वे