शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

सोन्याला दुष्काळाची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 10:25 PM

शेतकऱ्यांवर बाजारपेठेतील आर्थिक व्यवहाराची धुरा असताना दृष्काळाची झळ सोन्याच्या व्यवसायालाही बसली आहे. पंधरा दिवसांपासून सराफा बाजारात अवकळा पसरली होती, केवळ धनतेरसने सोन्याच्या व्यवसायाला उजाळा मिळाल्याने सुवर्णकारांची आशा पल्लवीत झाली.

ठळक मुद्देधनत्रयोदशीने उजाळा : शहरात ५० ते १०० कोटींची उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांवर बाजारपेठेतील आर्थिक व्यवहाराची धुरा असताना दृष्काळाची झळ सोन्याच्या व्यवसायालाही बसली आहे. पंधरा दिवसांपासून सराफा बाजारात अवकळा पसरली होती, केवळ धनतेरसने सोन्याच्या व्यवसायाला उजाळा मिळाल्याने सुवर्णकारांची आशा पल्लवीत झाली. यंदा शहरात ५० ते १०० कोटींच्या घरात आर्थिक उलाढाल झाल्याची शक्यता सुवर्णकारांनी वर्तविण्यात आली आहे.दिवाळी सणाच्या पर्वावर लक्ष्मी म्हणजेच पैशांच्या देवाण-घेवाणातून आर्थिक उलाढाल होत असते. अमरावतीच्या मुख्य बाजारपेठेत दिवाळीच्या पंधरा दिवसांपूर्वीपासून प्रचंड गर्दी उसळते. मात्र, यंदा बाजारपेठा थंडावल्या होत्या. धनतेरसला अचानक बाजारपेठेत गर्दी उसळल्याने व्यापारी वर्गाला थोडा दिलासा मिळाला. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेतील उलाढालीवर मोठा परिणाम पडल्याचे दिसून आले. याचा सर्वाधिक फटका सराफा व्यवसायावर पडला आहे. शहरात अडीचशेवर छोटे-मोठे सराफा व्यवसायीक आहेत. दरवर्षी सराफा बाजाराची १०० कोटीवर आर्थिक उलाढाल होते. मात्र, नोटबंदीनंतर बहुतांश व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले होते. आता ती स्थिती सुरळीत झाली असली तरी यंदाच्या दिवाळीत सुवर्ण व्यवसायासाठी दृष्काळग्रस्त ठरली आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान झाले. दृष्काळाची झळ शेतकºयांना बसल्याने शेतकरी हवालदिल झाले. शेतकऱ्यांच्या भरवशावर असलेली बाजारपेठेतील उलाढाल मंदावली आहे. सुवर्णकारांनाही दृष्काळाची झळ बसली. केवळ धनतेरसने सुवर्णकारांना तारले आहे.वर्षभरात दोन हजारांनी वाढले भावसोन्याचे भाव जागतिक बाजारपेठेनुसार ठरते. शेअर बाजार डाऊन झाला, तर सोन्याचे भाव वाढतात. डॉलरमध्येही चढउतार असल्यास सोन्याच्या भावावर परिणाम होतो. २०१८ च्या सुरुवातील सोन्याचे भाव ३०,२०० रुपये होते, त्यानंतर काही महिने भाव स्थित होते. लहान मोठे ग्राहकांकडून सोन्याची खरेदी सुरू होती. मात्र, आॅगस्ट महिन्यात सोन्याचे भाव ३१, ५०० पर्यंत गेले. त्यानंतरही आणखी महिनाभर भाव स्थिरावले होते. मात्र, आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात सोन्याचे भाव ३२ ५०० पर्यंत उंचावले. त्याचा फारसा परिणाम सोने खरेदीदारांवर जाणवला नाही.पार्किग व्यवस्था नसल्याने ग्राहकाने फिरविली पाठसोने खरेदीची मुख्य बाजारपेठ असणारा सराफा परिसर अरुंद असल्यामुळे यंदा अनेक ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्यातच शहरात मोठमोठ्या सुवर्ण व्यवसायीकांनी शहरात प्रतिष्ठाने थाटून पार्किंगसह योग्य ती सुविधा पुरविल्याने ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठच फिरविली आहे. सराफा बाजारात चारचाकी नेण्याइतपत कमकुवत जात असल्यामुळे वाहन पार्कींगची अडचण निर्माण झाली असून, त्याचा परिणाम सराफा व्यवसायावर पडल्याच्या प्रतिक्रिया सुवर्णकारांच्या दिल्या आहेत.शेतकºयांच्या भरवशावरच सोने व्यापार अंवलबून असतो. दृष्काळ, उत्पादन कमी अशा स्थितीत शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्या पैशांवर बाजारपेठेत आर्थिक होते. यंदा दृष्काळाची झळ सुवर्णकारांना बसली आहे. केवळ धनतेरसने सुवर्णकारांना तारले आहे.- अविनाश चुटके, सचिव, सराफा असोशिएशननोंदबंदीनंतर ग्राहकांनी पाठ फिरविली होती. आता सर्व सुरळीत सुरू असताना दृष्काळाची झळ सोसावी लागत आहे. शेतकºयांच्या भरवशावर सराफा बाजाराची मोठी उलाढाल होते. मात्र, यंदा लोकांजवळ पैसे नसल्यामुळे सोने खरेदी मंदावली आहे.- राजेंद्र भंसाली, सदस्य, सराफा असोशिएशन