अनिल कडू।
परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील गोंडविहीर धरणाच्या मुख्यसंरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. धरणाच्या मुख्य भिंतीलगत गाळाचा उपसा करण्यात आला आहे. गाळ नेणाऱ्यांनी चक्क पिचिंगच्या दगडांसह धरणाची मुख्य भिंतच पोखरून काढली आहे.धरणाच्या भिंतीपासून दोनशे मीटरच्या आता नो एन्ट्री झोनमध्येही गाळ नेणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. यात प्रकल्पाची स्थिती गंभीर बनली आहे. गौरखेड्यासह परतवाड्याला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात धरण फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अचलपूर तालुक्यातील मल्हारा गावालगत गोंडविहीर प्रकल्प १९७७ मध्ये अस्तित्वात आला. आज या धरणाच्या मुख्य भिंतीवरच मोठमोठी झाडे उभी ठाकली आहेत. भिंतीवर आणि गेटजवळ पोहचण्याकरिता असलेल्या पायºया नष्ट झाल्या आहेत. धरणातून पाणी बाहेर सोडण्याच्या गेटजवळील पाण्याचा मार्ग बंद पडला आहे. गाळाने बुजला आहे. त्याच्या दोन्ही बाजूच्या भिंतीही खचल्या आहेत. या मार्गातही मोठमोठी झाडे उभी आहेत. अनेक वर्षांपासून गेटसह प्रकल्पच दुर्लक्षित आहे. धरणाची स्थिती बघता अनेक वर्षांपासून धरणाची प्रत्यक्षात देखभाल व दुरूस्तीच केली गेलेली नाही. धरणाची माहिती देणारा नामफलकही धरणस्थळी नाही. धरणाच्या मुख्य संरक्षक भिंतीला आतल्या बाजूला दगडी पिचिंग नाही. प्रकल्पावर लक्ष ठेवण्याकरिता स्थानिक पातळीवर एकही कर्मचारी तैनात नाही. पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षित हा प्रकल्प लोकहितास्तव उपयुक्त असून बिच्छन नदीवर आहे. ही बिच्छन नदी गौरखेड्यासह परतवाडा शहराच्या मध्यभागातून वाहते. पावसाळ्यात दरवर्षी प्रकल्प पाण्याने पूर्णपणे भरतो. तेव्हा याच बिच्छन नदीला तीन ते चार मोठे पूरही जातात.गोंडविहीर प्रकल्प एप्रिल २०१६ पासून मध्यम व लघु पाटबंधारे विभाग अचलपूरकडे आला आहे. धरणाच्या मुख्यसंरक्षण भिंतीला तडे गेल्याची, प्रकल्पाची स्थिती गंभीर असल्याची माहिती आर. एस. मोहिते सहायक अभियंता श्रेणी-१ यांनी स्थानिक प्रशासनासह वरिष्ठांना दिली आहे. प्रकल्पातून गाळ नेण्यास मनाई करण्यात आली आहे. गाळ नेणाºयावर कारवाई करण्यास त्यांनी पोलिसांना सुचविले आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता र. कृ. ढवळे यांनी कार्यकारी अभियंता उ. ज. क्षीरसागर व सहायक अभियंता आर. एस. मोहिते यांच्या समवेत प्रकल्पाची पाहणी केली असता, तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंत्यांनी प्रकल्पस्थळीच स्थानिक अधिकाºयांना दिल्या आहेत.प्रकल्पातून होणाºया सिंचनाच्या वसुलीतून ४० टक्के खर्चच दुरूस्ती व देखभालीवर करता येतो. प्रत्यक्षात मात्र, या प्रकल्पावर सिंचनच नाही. सिंचन नसले तरी लोकहितकारी या प्रकल्पाची देखभाल व दुरूस्ती आवश्यक ठरते. प्रकल्पाची स्थिती गंभीर असली तरी प्रकल्पाच्या सुरक्षिततेला धोका नाही. डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन आणि मेरीच्या तज्ज्ञांकडून प्रकल्पाची तपासणी करून घेण्यात येईल.- आर. एस. मोहिते, सहायक अभियंता श्रेणी-१ , मध्यम व लघु पाटबंधारे विभाग, अचलपूर