हे आहे शुभ मुहूर्त
कोरोनाकाळात अनेकांनी मुहूर्त न पाहता मनप्रमाणे विवाह समारंभ उरकवण्यावर भर दिला. शासनाने शंभर लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्याची परवानगी दिली खरी, पण तिसरी लाट येण्याची भीती वर्तविल्याने कधी निर्बंध लागतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे आहे त्या तारखेतच विवाह सोहळा उरकविला जात आहे. या महिन्यात ३, ४, ११, १२, १४, १८, २०, २१, २५, २६, २७ व ३० तारखेला शुद्ध उपनयन मुहूर्त सांगण्यात आले आहे.
--
या असतील अटीसभागृहात शंभर व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह पार पाडता येणार आहे. सभागृहात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे बंधनकारक आहे. सोबतच सभागृह सॅनिटाईझ करणे, उपस्थित प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
--
परवानगीसाठी अग्निदिव्यच
विवाह समारंभ आयोजित करण्याकरिता वर-वधूकडील मंडळींना पोलीस प्रसासनाकडून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. यामध्ये लग्नाची पत्रिका, उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची नावे आणि सर्वांची कोरोना चाचणी करून अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागतात. हे सर्व कागदपत्र सादर केल्यानंतर पोलीस प्रसासनाकडून विवाहाची परवानगी दिली जाते. घरातील लग्नाची धामधूम त्यात परवानगीचा खटाटोप यामुळे कोरोनाकाळात विवाह करणे एक अग्निदिव्यच ठरत आहे.
--
वधू-वर पित्याची कसरत
मुलाचा विवाह ठरला होता. पण, लॉकडाऊनमुळे तारीख पे तारीख बदलावी लागली. आमच्या परिवारासह वधू मंडळीचीही मानसिकता खराब झाली होती. ४ तारखा रद्द करून अखेर पाचव्यांचा ठरिवलेल्या तारखेला विवाह सोहळा उरकवावा लागला.
- एक वरपिता, जरूड ता. वरूड
--
मुलीचे लग्न ठरले, तारीखही निश्चित झाली. परंतु, लॉकडाऊनमुळे वर पक्षाची मानसिकता बदलू लागली. आरटीपीसीआर चाचणीची अटक घातल्याने वर मंडळी चाचणी करून वर्ध्यात वरुडात यायला तयार नव्हते. यात मोठी पंचाईत झाली.
- एक वधूपिता, वरूड