शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
4
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
5
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
6
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
7
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
8
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
10
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
12
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
13
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
15
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
16
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
17
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
18
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
19
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
20
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य

'हेल्थ क्लब'च्या नावावर गोरखधंदा

By admin | Published: April 07, 2016 12:04 AM

येथील विवेकानंद कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका हेल्थ क्लबमध्ये आरोग्य सुधारणेच्या नावावर सामान्यजनांची राजरोसपणे दिशाभूल केली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

पावत्या नाही : प्रति शेक १८० रुपये, आहारतज्ज्ञांचा अभावअमरावती : येथील विवेकानंद कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका हेल्थ क्लबमध्ये आरोग्य सुधारणेच्या नावावर सामान्यजनांची राजरोसपणे दिशाभूल केली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या हेल्थ क्लबमध्ये महागडे पोषक पेय (न्युट्रीशन शेक) सर्व्ह केले जाते; तथापि अनेकांना या पोषक पेयांचे क्लबचालकांनी सांगितल्यानुसार निश्चित कालावधीत रिझल्टस् मिळत नाहीत. पेय घेणाऱ्यांनी यासंबंधाने चर्चा केल्यास, दोष पेयसेवनासाठी मोठी रक्कम खर्च करणाऱ्यांच्या दिनचर्येला देऊन क्लबचे सदस्य मोकळे होतात. या क्लबची संलग्नता असलेल्या एका अमेरिकन कंपनीची अत्यंत महागडी उत्पादने बोलविण्यासाठी मधूर संभाषणाचा वापर क्लब सदस्यांद्वारे केला जातो. उत्पादन बोलवेपर्यंत क्लबमधील प्रत्येक सदस्य ग्राहकाशी गोड बोलण्याचा कटाक्ष पाळतो. एकदा का उत्पादने बोलविलीत की, क्लबसदस्य ग्राहकांना दुर्लक्षित करतात. वेळप्रसंगी सेवा नाकारतात, क्लबबाहेर जाण्यासही सांगतात. अशा क्लबचा शहरात सुळसुळाट होत आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाने असल्या क्लबची वैधता तपासणे गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)अप्रशिक्षित सदस्यया क्लबमध्ये एकाच मुद्यावर वेगवेगळे सदस्य वेगवेगळे सल्ले देतात. शरीराला आवश्यक असणारे घटक जसे प्रोटिन्स, कार्बोहायड्रेड, व्हिटामिन्स किती प्रमाणात घ्यावेत, याविषयी अभावानेच एकवाक्यता आढळते. कुणाच्या शरीराला कुठला घटक किती प्रमाणात आवश्यक आहे, हे सांगण्यासाठी संबंधित विषयाचे तज्ज्ञ असणे आवश्यक आहे; सदर क्लबमध्ये याविषयीचा सल्ला देणारी, प्रमाण ठरवून देणारी मंडळी आहार विषयातील तज्ज्ञ असण्याचा कुठलाही शैक्षणिक पुरावा त्यांच्याकडे नाही.आजार बरे करण्याचे दावेन्यूट्रीशन पेय घेल्यामुळे कॅन्सर, मधुमेह, हृदयविकार, लिव्हर सिरोसिस, किडनी डिसॉर्डर यासारखे दुर्धर आजार बघता-बघता छुमंतर होतात, असा प्रचार या क्लबमधील सदस्यांद्वारे नियमितपणे केला जातो. त्यासाठी अनेकांची तोंडी उदाहरणेही दिली जातात. क्लबमध्ये १८० रुपयांना एक शेक मिळतो. ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या या रकमेच्या पावत्या दिल्या जात नाहीत.