शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

संवैधानिक मूल्यांची सरकारकडून पायमल्ली: नागनाथ कोतापल्ले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 5:35 PM

देशात अनेकदा क्रांती आणि प्रतिक्रांती घडली आहे. १९२५ पासून देशात तीन प्रमुख विचारप्रवाह कार्यरत झाले.

अमरावती : संविधानाला न बदलविता संवैधानिक मूल्यांची सरकारकडून पायमल्ली केली जात असल्याचे प्रतिपादन मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले. प्रगतिशील लेखक संघाच्या अमरावती येथील चौथ्या अधिवेशनाच्या उद्घाटनीय सत्राच्या अध्यक्षस्थानावरून कोतापल्ले रविवारी बोलत होते. त्यांच्या मते, पुरातन काळापासून या देशात ब्राह्मण संस्कृती आणि श्रमण संस्कृती, असा संघर्ष सुरू आहे. 

देशात अनेकदा क्रांती आणि प्रतिक्रांती घडली आहे. १९२५ पासून देशात तीन प्रमुख विचारप्रवाह कार्यरत झाले. १९२५ मध्येच ब्राह्मणेतर काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. देशामध्ये महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक समतेची चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ अशा परिवर्तनाच्या चळवळींनी देशात वाटचाल केली. त्याचवेळी देशातील सनातन, कर्मठ रुढी परंपरावादी व वर्चस्ववादी विचारांनी संघटित होण्याचे व पुरोगामी चळवळीला प्रतिकार करण्याचे काम केल्याचे कोतापल्ले म्हणाले. 

स्वातंत्र्यानंतर भारतीय संस्कृतीत व सर्वसामान्य शोषित पीडित समाजाच्या कल्याणाचा घटनेत अंर्तभाव करून राज्यघटना अस्तित्वात आली. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या संविधानात भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब नाही व ती काहीच कामाची नाही, असे सांगून घटनेला गोधडी संबोधले होते. त्यानंतर ज्यांचा राज्यघटनेवर विश्वास नाही, अशा लोकांच्या हातात देशाची सत्तासूत्रे असल्यामुळे ते गोळवलकरांचा 'दी बंच ऑफ थॉट' यातील विचारावर आधारित भारत घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातूनच देशात सध्या विभाजनाची, असंतोषाची व अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा भारतीय फॅसिझम नव्या स्वरुपाचा असून मानव जातीला कल्याणकारी ठरणारा नाही, असे कोतापल्ले म्हणाले.   सिने अभिनेते तथा लेखक वीरा साथीदार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रलेसंचे राष्ट्रीय सचिव तथा हिंदी साहित्यिक विनीत तिवारी यांनी बीजभाषण केले. यावेळी हिंदी साहित्यिक उषा आठल्ये(छत्तीसगढ) जी. के. एनापुरे, शाहीर शीतल साठे, डॉ. काशिनाथ बऱ्हाटे व्यासपीठावर उपस्थित होते. या अधिवेशनास कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे कार्यक्रमाचे समन्वयक प्रसेनजित तेलंग होते. यावेळी श्रीराम पवार (मुंबई), प्रवीण बनसोड (विदर्भ), समाधान वानखडे (मराठवाडा), दत्ता घोलप (पश्र्चिम महाराष्ट्र), संदीप पवार (कोकण) व उत्तर महाराष्ट्रातील अहवाल वाचन प्रमोद अहिरे यांनी केले. प्रास्ताविक राकेश वानखडे, तर स्वागतपर भाषण काशिनाथ बऱ्हाटे यांनी केले.  संचालन मंगेश भुताडे यांनी केले, तर आभार प्रसेनजित तेलंग यांनी मानले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन