शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गरीब, सामान्य कैद्यांचे दंड, जामिनाची रक्कम सरकार भरणार

By गणेश वासनिक | Updated: January 27, 2025 14:28 IST

केंद्र शासनाचा पुढाकार : राज्यात प्रभावी अंमलबजावणीसाठी चार सदस्यीय स्वतंत्र समिती

अमरावती : कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी गरीब, सामान्य कैद्यांचे दंड भरणे किंवा जामिनाची रक्कम भरण्यास ‘आर्थिक’ मदत ही विशेष योजना लागू करण्यात आली आहे. त्याकरिता केंद्र शासनाने पुढाकार घेतला असून, या योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चार सदस्यीय पर्यवेक्षी समिती गठित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने गृह विभागाने १० जानेवारी रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

या कैद्यांंना मिळेल मदत‘सपोर्ट टू पुअर प्रीझन’ या अंतर्गत मध्यवर्ती, जिल्हा, महिला, खुले कारागृहातील कैद्यांना आर्थिक मदतीचा हात मिळणार आहे. यात गरीब कैदी, सामाजिक दृष्ट्या वंचित, कमी शिक्षित, अल्पउत्पन्न गटातील कैद्यांना लाभ होऊन कारागृहाबाहेर येण्यास मदत होईल.

अशी आहे पर्यवेक्षी समिती आणि कार्यकक्षादारिद्र्य, अज्ञान, निरक्षरता आणि उपेक्षित दुर्बल घटकातील कैद्यांना केंद्र शासनाच्या ‘सपोर्ट टू पुअर प्रीझन’ या योजनेची मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाने चार सदस्यीय समिती गठित केली आहे. यात अध्यक्षपदी पुणे आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, सदस्य म्हणून येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे, तर सदस्य सचिव नागपूर कारागृह उपनिरीक्षक कार्यालयाचे उपअधीक्षक दयानंद सोरटे यांचा समावेश आहे. या समितीची कार्यकक्षा शासनाने ठरवून दिली आहे. त्यानुसार दर महिन्याला बैठकीचे आयोजन करून सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे.

"कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या या योजनेचा कैद्यांना नक्कीच लाभ होईल. त्यानुसार समितीदेखील गठित झाली असून, लवकरच बैठक होईल. गरीब, दुर्बल कैद्यांचे दंड भरणे, जामिनासाठी मदत सरकार करणार आहे."- जालिंदर सुपेकर, आयजी, कारागृह विभाग

टॅग्स :Amravatiअमरावती