शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

विरोध झुगारून सत्ताधाऱ्यांंचे ‘नियोजन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 10:33 PM

विरोधी पक्षांचा विरोध झुगारून जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी जनसुविधा योनजेचे ७२ कोटी ०९ लाख रुपयांचे नियोजन रद्द करून, सुधारित नियोजनाचा ठराव पारीत केला. यासोबतच लोकपयोगी लहान कामे जिल्हा निधीमधून ११ लाख रुपये वाढीव निधीचा ठरावही बहुमताच्या बळावर मंजूर केला. जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या आमसभेचे हे वैशिष्ट्य ठरले.

ठळक मुद्देझेडपीची आमसभा : बहुमताच्या जोरावर प्रस्तावांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विरोधी पक्षांचा विरोध झुगारून जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी जनसुविधा योनजेचे ७२ कोटी ०९ लाख रुपयांचे नियोजन रद्द करून, सुधारित नियोजनाचा ठराव पारीत केला. यासोबतच लोकपयोगी लहान कामे जिल्हा निधीमधून ११ लाख रुपये वाढीव निधीचा ठरावही बहुमताच्या बळावर मंजूर केला. जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या आमसभेचे हे वैशिष्ट्य ठरले.जनसुविधेकरीता ग्रामपंचायतींना १० आॅक्टोबरला जाहीर केलेले ७२.९ कोटींचे विशेष अनुदान रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या निधीचे सुधारित नियोजन सताधाऱ्यांनी केले. मात्र, नियोजनाचा अधिकार सभागृहाला आहे का, असा प्रश्न विरोधी सदस्यांनी केला. पीठासीन सभापतींनी उत्तर न दिल्याने पक्षनेता रवींद्र मुंदे यांनी प्रशासनाकडे विचारणा केली. यावर उत्तर मिळत नसल्याने रवींद्र मुंदे, सुहासिनी ढेपे, शरद मोहोड, प्रवीण तायडे आदींनी गोंधळ घातला. अखेर सीईओ मनीषा खत्री यांनी हे अधिकार डीपीसीला असल्याचे सांगितले. यासोबतच अध्यक्षांचे गाव असलेल्या पळसखेड येथे सिमेंट रस्ता बांधकामासाठी २९ लाख रुपयांचा निधी, तर सावंगा येथेही याच कामासाठी १२ लाखांचा निधी जिल्हा निधीतून मंजूर केला होता. अंदाजपत्रक वाढल्याने पुन्हा वरील कामासाठी अनुक्रमे चार आणि सात लाखांचा वाढीव सुधारित प्रस्ताव मांडण्यात आला. जिल्हा निधीत यासाठी पैसे आहेत का, याची माहिती सभागृहात देण्याची मागणी विरोधकांनी रेटली. यावर अध्यक्षांनी काहीच न ऐकल्याने गदरोळ वाढला. अखेर सीईओ मनीषा खत्री यांनी याबाबत माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी सभेत विषयसूचीवरील विविध १७ ठरावही मंजूर करून आमसभा आटोपल्याचे नितीन गोंडाणे यांनी घोषित केले. यावेळी सभेला उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती बळवंत वानखडे, सुशीला कुकडे, वनिता पाल, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, पूजा हाडोळे, प्रियंका दगडकर, अभिजित बोके, सुनील डिके, अनिला मेश्राम, वासंती मंगरोळे, प्रकाश साबळे, विठ्ठल चव्हाण, विजय काळमेघ यांच्यासह सदस्य, सर्व खातेप्रमुख, बिडीओ उपस्थित होते.जनसुविधा, लोकपयोगी कामे याबाबतचे सुधारित नियोजन व वाढीव निधीचे ठराव बहुमताने मंजूर केले आहेत. विरोधक विकासकामांत अडचणी आणत आहेत. हे कामकाज नियमानेच झाले. विरोधकांच्या आरोप तथ्य नाही.- नितीन गोंडाणेअध्यक्ष, जि.प.जिल्हा निधीत लाभार्र्थींना साहित्य देण्यासाठी पैसे नाहीत तरीही अध्यक्षांच्या गावात वाढीव निधी मंजूर केला. जनसुविधा योजनेच्या कामाला डीपीसीची मंजुरी आवश्यक असताना सत्ताधारी नियम पायदळी तुडवित आहेत.- रवींद्र मुंदेविरोधी पक्षनेता