Bhagatsingh Koshyari: राज्यपालांच्या पोस्टरला जोडे मारले, धोतरही जाळलं, काँग्रेस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 01:15 PM2022-11-21T13:15:30+5:302022-11-21T13:24:46+5:30

राज्यपालांच्या फोटोला जोडो मारत, धोतर फाडून, धोतराची होळी करण्यात आली. यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्यपाल परत जा... परत जा.. अशा घोषणा देत राज्यपालांचा निषेध नोंद

Governor's poster was attacked, dhoti was also burnt, Congress is aggressive in amravati after statement of shivaji maharaj | Bhagatsingh Koshyari: राज्यपालांच्या पोस्टरला जोडे मारले, धोतरही जाळलं, काँग्रेस आक्रमक

Bhagatsingh Koshyari: राज्यपालांच्या पोस्टरला जोडे मारले, धोतरही जाळलं, काँग्रेस आक्रमक

Next

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात राज्यात शिवप्रेमी आणि राजकीय पक्षही आक्रमक झाले आहेत. रस्त्यावर उतरुन अनेकजण राज्यपालांचा निषेध नोंदवत असून आज काँग्रेसने राज्यात विविध ठिकाणी आक्रमक आंदोलन केले. तर, शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही आक्रमक झाल्यांच दिसून आलं. अमरावतीतकाँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे, अमरावतीच्या राजकमल चौकात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात जोरदार आंदोलन करत राज्यपालांच्या पोस्टरवर जोडे मारुन निषेध नोंदवला.

राज्यपालांच्या फोटोला जोडो मारत. धोतर फाडून धोतराची होळी करण्यात आली. यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्यपाल परत जा... परत जा.. अशा घोषणा देत राज्यपालांचा निषेध नोंदवला. तसेच, भाजप प्रवक्ता सदांशू त्रिवेदी यांचाही निषेध करण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अमरावतीत आले, तर त्यांचे धोतर फाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच युवक काँग्रेसच्यावतीने देण्यात आला. तसेच, भाजप नेत्यांना अमरावती फिरू देणार नाही, असेही काँग्रेसने म्हटले आहे. 

बुलडाण्यातही काँग्रेसकडून निषेध

छत्रपती शिवरायांसह इतर महापुरुषांचा अवमान करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी यांना तात्काळ राज्यपाल पदावरून निष्कासित करावे, त्याचबरोबर भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बुलढाण्यातील खामगावमध्ये जिजाऊ ब्रिगेड आणि सकल मराठा समाजाच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली, त्याचबरोबर धोती आणि काळी टोपी जाळत भगतसिंग कोश्यारींचा तीव्र निषेध करण्यात आला. 

शिवसेनाही उतरली रस्त्यावर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याविरोधात राज्यभरात शिवसेनेचे आंदोलन सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या जमान्याचे आदर्श होतेच पण वर्तमान आणि भविष्यात देखील ते कायम आदर्श आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसांचे आणि हिंदुचे नाहीत, तर ते संपुर्ण हिंदुस्थानाचे आदर्श व्यक्तिमत्व आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले, तेही राज्यपालांविरुद्ध रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. 

Web Title: Governor's poster was attacked, dhoti was also burnt, Congress is aggressive in amravati after statement of shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.