लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मागील चारशे वर्षांपासून अचलपूर शहरातील जीवनपुरा येथील बालाजी संस्थान मंदिरातील लोटांगण घालण्याची प्रथा कायम असून शुक्रवारी पहाटे ५ वाजता ४७ भक्तांनी मंदिर ते बिच्छन नदीच्या पात्रापर्यंत लोटांगण घालून आपल्या श्रद्धेचा परिचय देत पूजा अर्चा केली.परतवाडा - अचलपूर या जुळ्या शहरात आजही पारंपारिक सण, उत्सव साजरे करण्याची प्रथा कायम आहे. जीवनपुरा येथे तिरुपती बालाजीचे प्राचीन मंदिर आहे. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला (माडी पौर्णिमा) बालाजीचे भक्त येथे मोठा उत्सव साजरा करतात. परिसरातील महिला-पुरुष व नोकरदार बाहेरगावी राहत असले तरी बालाजी यात्रेच्या लोटांगणासाठी गावी परत येतात. आपले मागणे मान्य झाले किंवा श्रद्धेने हे लोटांगण घातल्या जाते. मुलांपासून तर वयोवृद्ध पुरुष मंडळीच हे लोटांगण घालतात, हे विशेष! या यात्रेमुळे गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.मनोकामना पूर्ण होणार, अशी श्रद्धापहाटे ५ वाजता बालाजीची आरती शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर बालाजीला नतमस्तक होत होतात. नारळ घेऊन रस्त्याने एक किलोमीटर अंतरापर्यंत ४७ भक्तांनी लोटांगण घातले. आपली मनोकामना पूर्ण होत असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. काही पूर्ण झाली म्हणून तर काहींनी श्रद्धेने लोटांगण घातले. लोटांगण टाकणाºयापुढे गोविंदा, गोविंदा म्हणत जयघोष केला.रस्त्यावर रांगोळ्या अन् फुलेलोटांगण कार्यक्रमासाठी संपूर्ण रस्ता स्वच्छ धुण्यात आला. पहाटे ४ वाजतापासून भक्त आंघोळ करीत घरीच पूजा केली. रस्त्यावर रांगोळ्या अन् फुले सजविण्यात आली होती. मागील तीन वर्षांपासून बिच्छन नदीला पाणी नसल्याने टँकरने एक खड्डा करुन पाणी सोडण्यात आले होते. तीन दिवस विविध कार्यक्रम आणि जत्रा येथे भरली. या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती,दरवर्षीप्रमाणे यावर्षी ४७ भक्तांनी लोटांगण घातले. बालाजी संस्थान व जीवनपुरातील नागरिकांचे यासाठी नियमित सहकार्य आम्हास लाभले.- प्रमोद शामगुलेपुजारी बालाजी संस्थान, अचलपूर
गोविंदा, गोविंदाच्या जयघोषाने निनादला जीवनपुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 12:00 AM
मागील चारशे वर्षांपासून अचलपूर शहरातील जीवनपुरा येथील बालाजी संस्थान मंदिरातील लोटांगण घालण्याची प्रथा कायम असून शुक्रवारी पहाटे ५ वाजता ४७ भक्तांनी मंदिर ते बिच्छन नदीच्या पात्रापर्यंत लोटांगण घालून आपल्या श्रद्धेचा परिचय देत पूजा अर्चा केली.
ठळक मुद्देचारशे वर्षांची परंपरा : एक किलोमीटर अंतरापर्यंत घातले लोटांगण