अमरावती : आठ तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. यामध्ये ६१ प्रभागांमधील २५,२२६ मतदार १९ सरपंच व १३१ सदस्यांसाठी मतदानाचा हक्क बजावतील. प्रक्रियेसाठी २४८ मतदान अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर आहेत. याशिवाय ११२ कर्मचारी राखीव राहणार असल्याची माहिती, जिल्हा निवडणूक विभागाने दिली.
जिल्ह्यात डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत संपणाऱ्या १९ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यात टेंभूसोडा, सोनापूर व मेहरीआम, अचलपूर तालुक्यात देवगाव, पिपंळखुटा, निमदरी मोर्शी तालुक्यात रिद्धपूर, मनिमपूर, गोराळा, ब्राह्मणवाडा, भातकुली तालुक्यात बैलमारखेडा, धारणी तालुक्यात बोबदो, जामपाणी, भोंडीलावा अंजनगाव सुर्जी तालुक्यात जवळा बु. हयापूर, चांदूर रेल्वे तालुक्यात कारला, पाथरगाव व चांदूरबाजार तालुक्यात मिर्झापूर ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे.