शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

ग्रामपंचायत निवडणूक : शेतकºयांनी भाजपला नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:54 PM

जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी पार पडलेल्या मतमोजणीनंतर भाजपक्षासाठी 'बुरे दिन' आल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देपुन्हा काँग्रेस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी पार पडलेल्या मतमोजणीनंतर भाजपक्षासाठी 'बुरे दिन' आल्याचे स्पष्ट झाले. देश काँग्रेसमुक्त करण्याच्या भाजपाच्या इराद्यांना अमरावतीच्या ग्रामीण जनतेने सुरूंग लावला आहे. तब्बल १३४ सरपंच निवडून आल्याची माहिती काँग्रेसने पत्रपरिषदेतून दिली. ही टक्केवारी ५४ इतकी होते. भाजपक्ष दावे मोठे करीत असला तरी अधिकृत पत्रपरिषद मात्र त्यांनी घेण्याचे टाळले.जिल्ह्यात २४९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ९८२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ७९३ प्रभागांतून २,०५९ सदस्यपदांसाठी ३,२६४ उमेदवार रिंगणात होते. सकाळी ११ नंतर सरपंचपदाचे निकाल जाहीर होताच जनतेने काँग्रेसला कौल दिल्याचे स्पष्ट झाले.केवळ काँग्रेसचे आमदार असणाºया मतदारसंघातच नव्हे, तर बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस समर्थित सरपंचांनी बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले. दुपारनंतर आलेल्या निकालात दुसºया स्थानी भाजपसमर्थित सरपंच निवडून आलेत. प्रहार, शिवसेना, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांसह स्थानिक आघाड्यांचीही काही ठिकाणी सरशी झाली आहे. बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणाप्रणित युवा स्वाभिमान पार्टीने १२ जागांवर विजय मिळविला.चांदूर रेल्वे मतदारसंघात विजयाचे दावे-प्रतिदावेथेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या राजकीय वर्चस्वाचे दावे प्रतिदावे केले. दरम्यान, चांदूर रेल्वे मतदारसंघात सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत़ या मतदारसंघातील तीनही तालुक्यांमध्ये शेवटच्या टप्प्यात राजकीय रंग चढला़ काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी धामणगाव तालुक्यात ५, नांदगाव खंडेश्वर ९ व चांदूर रेल्वे तालुक्यात १० सरपंचपदाचे विजयी उमेदवार काँग्रेसचे असल्याची माहिती दिली. धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी नांदगाव खंडेश्वरमध्ये भाजपने ९, चांदूर रेल्वे ९, धामणगाव रेल्वे तालुक्यात ४ जागा काबीज केल्याचा दावा केला आहे.वरुड-मोर्शीची सोशल मीडियावर चर्चाजिल्ह्यात सर्वत्र क ाँग्रेस विजयी झाल्याची चर्चा होती, तर विदर्भासह संपूर्ण राज्यात भाजपने मतदारसंघनिहाय आकडे जारी करून विजय मिळविल्याचा फार्स निर्माण केला. मोर्शी-वरुड तालुक्यात १५ जागांवर विजय मिळविल्याचे संदेश राज्यभर फिरत होते. प्रत्यक्षात मोर्शी व वरुड तालुक्यात अनुक्रमे २४ व २३ अशा एकूण ४७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात भाजपचा १५ जागांचा दावा असला तरी ५० टक्क््यांचा आकडाही पार केला नव्हता. वरुड तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने १८ जागा जिंकल्याचा दावा केला. मोर्शी तालुक्यात ११ जागांवर काँग्रेस समर्थित उमेदवारांनी विजय मिळविला.१५९ सरपंच, भाजपचा दावाकाँग्रेसने सरपंचपदाचे १३४ उमेदवार निवडून आल्याचे पत्रपरिषदेत जाहीर केल्यावर एका अंकाने सरस असल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी केला. त्यांनी भाजपचे १३५ उमेदवार विजयी झाले असल्याची माहिती दिली. सोबतच त्यांनी भाजपा व मित्रपक्ष मिळून एकूण १५९ सरपंच असल्याचा दावा केला. आम्ही बुधवारी सर्व १५९ सरपंचांना शपथपत्रासह हजर करणार असल्याचे ते म्हणाले. तिवसा, भातकुली, चांदूर रेल्वे या तालुक्यांत पिछाडीवर असल्याचे त्यांनी मान्य केले.भाजप सर्वत्रपिछाडीवरधारणी तालुका वगळता भाजपने दणदणीत यश मिळविल्याचा दावा केला नाही. चांदूरबाजार, अचलपूर तालुक्यात प्रहारला यश मिळाले. काँग्रेसचे अस्तित्व तेथेही आहेच. तिवसा, धामणगाव, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, भातकुली, वरुड व मोर्शी या तालुक्यांत काँग्रेसने निर्विवाद विजय मिळविला आहे.कॉग्रेस आमदारांचा करिश्मा कायमआमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा व आमदार वीरेंद्र जगताप यांच्या चांदूर रेल्वे मतदारसंघात काँग्रेसने सर्वाधिक जागांवर विजय मिळविला आहे. मोदी लाटेतही काँग्रेसच्या या दोन नेत्यांनी आमदारकीत देखणा विजय मिळविला होता. पुढे ही परंपरा विविध निवडणुकांत कायम ठेवत आता थेट सरपंचपदाच्या निवडणुकांमध्येही त्यांनी स्वनेतृत्वाचा ठसा उमटविला आहे.