अमरावती: जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायती पैकी ८२३ ग्रामपंचायतीमध्ये दीड वर्षानंतर ग्रामसभा १५ ऑगस्ट रोजी घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी घेतला आहे. मात्र १६ ग्रामपंचायत मध्ये कोरोनाचा संसर्ग कायम असल्यामुळे या ठिकाणी ग्रामसभा होणार नसल्याचेही प्रशासनाने काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. ग्रामसभा घेतांना मात्र कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे बंधनकारक आहे.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. त्याचा फटका ग्रामसभा नाही बसला होता. परिणामी जवळपास दीड वर्षापासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या नव्हत्या.त्यामुळे ग्रामपातळीवरील प्रश्नही रखडले होते. अशातच आता कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव कमी झाली आहे.परिणामी रुग्णांची संख्याही एक अंकी आकडयावर आली आहे. ही बाब लक्षात घेता ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी पवनित कौर यांचे मार्गदर्शनाखाली मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील ८३९ पैकी ८२३ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्याचा निर्णय जारी केला आहे. यानुसार पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप मानकर यांनी सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना लेखी सूचना देवून आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये १६ ग्रामपंचायतींचा अपवाद वगळता अन्य ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत.
बॉक्स
येथे नाही होणार ग्रामसभा
अमरावती तालुक्यातील टेंभा व माहुली जहागीर, वरूड मधील सुरळी, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा,मुऱ्हा,कुंभारगाव, अचलपूर मधील गोरगांव ,चमक, चांदुर रेल्वेतील राजना, मांजरखेड, चांदूर बाजार मधील शिरजगाव, धारणीतील दिया, चक्रापूर ,दूनी, तिवसा सार्सी, नांदगाव खंडेश्वर मधील दाभा आदी ग्रामपंचायतीत ग्रामसभा कोरोनाच्या संसर्गामुळे होणार नाहीत.
कोट
ग्रामसभेचे ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व मतदार सभासद आहेत.दिडवर्षानंतर ग्रामसभा होणार असल्याने उपस्थिती मोठी राहू शकते.कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे नियम कसे पाळावेत हा खरा प्रश्न आहे.कारण यात अनेक अडचणी ग्रा.प.मध्ये आहेत.
कमलाकर वनवे
जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक युनियन
जिल्हा शाखा
कोट
ज्या गावात कोरोनाचा संसर्ग कायम आहे .अशा १६ ग्रामपंचायती वगळता ८२३ ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा घेण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे त्यानुसार बीडीओ मार्फत संबंधितांना सूचना देण्यात आले आहेत.
अविशांत पंडा
मुख्य कार्यकारी अधिकारी