यशोमती ठाकूर : वाठोड्यात तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव भातकुली : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कुठलाही न्यूनगंड न बाळगता कला व क्रीडा क्षेत्रात गायिका वैशाली माडे हिच्याप्रमाणे उत्तुंग यश संपादन करावे, असे आवाहन आ. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. नजीकच्या वाठोडा शुक्लेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर बुधवारी आयोजित तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सुनीता वानखडे होत्या. प्रमुख अतिती म्हणून पंचायत समिती सभापती सुनीता वानखडे, उपसभापती संगीता चुनकीकर, जि.प. सदस्य कृष्णराव पवार, संगीता चक्रे, जयंत देशमुख, अजीज पटेल, सुनीता कैथवास, वंदना रावेकर, कोकीळा पवार, गटविकास अधिकारी सुरेश थोरात, नंदकुमार धारगे, गटशिक्षणाधिकारी गणेश बोपटे, उपसरपंच अनिल अली आदींची उपस्थिती होती. या दोेन दिवसीय तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवात भातकुली, टाकरखेडा व खारतळेगाव परिक्षेत्रातील उपकेंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवातील खेळाडू व शिक्षकांचा सहभाग होता. विजयी स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. कार्यक्रमात सरला इंगळे, सुशीला मकेश्वर, रवींद्र रावेकर, विश्वास वानखडे, हरीश मोरे, रवी बुरघाटे, संजय खोडस्कर, रामदास डहाके, मुकद्दर खाँ पठाण, अशोक कैथवास, सुरेश उताणे, काजीभाई आदींची उपस्थिती होती. संचालन वैशाली ढाकुलकर तर आभार विस्तार अधिकारी नितीन उंडे यांनी मानले. (वार्ताहर)
ग्रामीण विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये
By admin | Published: January 23, 2016 12:36 AM