लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सामाजिक कार्यासाठी लोकसहभागातून भव्य असे सभागृह उभारण्याचा मानस श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासाठी संस्थेत कार्यरत प्राध्यापकांकडून तीन वर्षांकरिता ठेव स्वरुपात बिनव्याजी रक्कम गोळा करण्यात आली असून, सद्यस्थितीत तीन कोटी रुपये जमा झाले आहे. या भव्य वास्तूचा अमरावतीकरांना लाभ मिळणार असून, हे सभागृह अमरावतीच्या वैभवात भर घालेल, अशी माहिती मंगळवारी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दिली.निवडणुकीनंतर दुसºयांदा हर्षवर्धन देशमुख यांनी माध्यमांशी दिलखुलास संवाद साधला. गेट टु गेदर म्हणून त्यांनी मंगळवारी पत्रपरिषद बोलावून संस्थेच्या विविध महत्त्वपूर्ण कार्याची माहिती दिली. श्री शिवाजी शिक्षण संस्था केवळ शैक्षणिक संस्था म्हणून कार्यरत न ठेवता जनतेच्या लोकसहभागातून महत्त्वाचे उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पीडीएमसी परिसरात १२०० व्यक्ती बसतील, असे सभागृह उभारणार आहे. यासाठी दहा कोटीचा खर्च अपेक्षित असून लोकसहभागातून हा प्रकल्प साकारण्याचा प्रयत्न संस्थेने चालविले आहे. पत्रपरिषदेत अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह दिलीपबाबू इंगोले, अशोक ठुसे, अधिष्ठाता पदमाकर सोमवंशी, शेषराव खाडे, गांवडे, ठाकरे, प्रमोद देशमुख, मीनाक्षी गावंडे, श्रीकांत देशमुख, कुमार बोबडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.आजीवन सदस्यांना सवलतीत आरोग्य सेवासंस्थेच्या आजीवन सदस्यांना आरोग्यसंदर्भात मदत व्हावी, यासाठी १० एप्रिल २०१८ पासून 'डॉ. पंजाबराव देशमुख निरामय योजना'सुरु करण्यात आली. यामध्ये सदस्य व त्याच्या कुटुंबीयांना सवलत दरात उपचाराचा लाभ घेता येणार असल्याची माहिती हर्षवर्धन देशमुख यांनी दिली.बिंदूनामावली मंजूरबिंदुनामावलीच्या त्रुट्यामुळे मागील नऊ वर्षांपासून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या रिक्त जागा भरण्यासाठी परवानगी नव्हती. मात्र, संस्थेने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आता माध्यमीक शाळातील 'क' संवर्गीय सहायक शिक्ष व अध्यापक विद्यालय शिक्षक संवर्गांची बिंदू नामावली मंजुर झाली आहे. तसेच प्राथमिकचे शिक्षक, माध्यमीकचे उपमुख्याध्यापक व वरिष्ठ-कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक संवर्गांची बिंंदुनामावली तयार करून त्याच्या मंजुरेचे प्रयत्न संस्थेने सुरु केले आहे.किरकोळ कामांसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांना निधीसंस्था संचालीक शाळा-महाविद्यालयात बांधकामसंदर्भातील किरकोळ कामासाठी मुख्याध्यापक व प्राचार्यांना निधी पुरविला जाणार आहे. मुख्याध्यापकांना ५० हजार व प्राचार्याने १ लाखापर्यंतची कामे त्याच्या अधिकार क्षेत्रात करता येणार आहे.
लोकसहभागातून उभारणार अमरावतीकरांसाठी भव्य सभागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:27 PM
सामाजिक कार्यासाठी लोकसहभागातून भव्य असे सभागृह उभारण्याचा मानस श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासाठी संस्थेत कार्यरत प्राध्यापकांकडून तीन वर्षांकरिता ठेव स्वरुपात बिनव्याजी रक्कम गोळा करण्यात आली असून, सद्यस्थितीत तीन कोटी रुपये जमा झाले आहे.
ठळक मुद्देतीन कोटींची रक्कम उभारली : श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा निर्णय