आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी मराठी भाषा गौरव दिन थाटात साजरा करण्यात आला.स्थानिक नेहरू मैदान येथून दुपारी ४ वाजता मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव करणारी ग्रंथदिंडी काढण्यात आली. राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ, मालविय चौक, इर्विन चौक ते संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अशा मार्गातील ग्रंथदिंडीत पताका, ढोल-ताशांच्या गजर तसेच मराठमोळी संस्कृती अनुभवता आली. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा विभागाचे संचालक जयंत वडते, लेखा व वित्त अधिकारी शशिकांत आस्वले, मराठी विभागप्रमुख मनोज तायडे, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख अविनाश असनारे, हेमंत खडके, मोना चिमोटे, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर आदी उपस्थित होते. उशिरा सायंकाळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी समारंभाचे उद्घाटन केले. ‘मायमराठी’ विषयावर त्यांनी व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य रॅली, ग्रंथ दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 10:38 PM
राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी मराठी भाषा गौरव दिन थाटात साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देविद्यापीठाचे आयोजन : भगव्या पताका, ढोल-ताशांचा गजर, मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन