नव्या वर्षाच्या पहिली दिवशी अभिनव उपक्रम : १३ गावांत अभियान
अमरावती : निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वावर आधारित जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये माझी वसुंधरा अभियानांतर्गत निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीसह जिल्हा परिषद आणि १४ पंचायत समितींमध्ये नववर्षाच्या दिवशी माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
माझी वसुंधरा अभियान जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील वलगांव, नांदगाव पेठ, अचलपूरमधील कांडली, पथ्रोट, चांदूर बाजार मधून ब्राह्मणवाडा थडी, शिरजगांव कसबा, वरूडमधील जरूड व पुसला, भातकुलीतील खोलापूर, दर्यापूरमधून येवदा, तिवस्यामधून कुऱ्हा, मोशीतील नेरपिंगळाई आणि धामनगांव रेल्वे मधील तळेगाव दशासर, आदी ग्रामपंचायतीमधील कर्मचारी, तसेच नागरिकांना, झेडपी व पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी हरित शपथ दिली जाणार आहे. वसुंधरा अभियान हे निवडक ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येत असले तरी वसुंधरेच्या प्रति आपली जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांनी आपला सहभाग म्हणून १ ते १५ जानेवारी या कालावधीत माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आणि शपथ घेण्याबाबत राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी झेडपी सीईओंना दिले आहेत. त्यानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला कोरोना सर्व नियमांचे पालन करून ग्रुपने किंवा वैयक्तिकरीत्या ऑनलाईन हरित शपथ घेतली जाणार आहे.
कोट
माझी वसुंधरा अभियानात निवडलेल्या १३ ग्रामपंचायतींमध्ये चांगले काम सुरू आहे. या ठिकाणी कर्मचारी व नागरिकांना हरित शपथ दिली जाणार आहे. याशिवाय पंचायत समिती व झेडपी मुख्यालयातही ही शपत घेतली जाणार आहे. याबाबत ग्रामपंचायत व पंचायत समितींना बाबतचा अहवालसुद्धा मागविला आहे.
अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी