शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

हिरव्या मिरचीची बेभाव विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 9:32 PM

तालुक्यात नगदी पीक म्हणून एका दशकापासून मिरचीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले असले तरी बाजारपेठ पारंपरिक आणि खरेदीदार मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. हिरवी मिरची कवडीमोल विकली जात असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले, बाजारपेठ पारंपरिकच

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यात नगदी पीक म्हणून एका दशकापासून मिरचीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले असले तरी बाजारपेठ पारंपरिक आणि खरेदीदार मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. हिरवी मिरची कवडीमोल विकली जात असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी मिरचीची रात्री भरणारी बाजारपेठ म्हणून राजुराबाजार प्रसिद्ध आहे. अलीकडच्या दहा वर्षांत नवीन वाणांमुळे मिरची अधिक तिखट आणि जादा उत्पादन देणारी ठरली आहे. मिरचीएवढी रोख रक्कम अन्य पिके देऊ शकत नसल्याने या पिकाकडे शेतकरी वळला आहे. आता एकरी २५ ते ४० क्विंटल तोडा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे किमान एकरभराचे क्षेत्र किमान पाच एकरावर गेले आहे. या अतिरिक्त मालाच्या तुलनेत राजुराबाजार येथील मिरचीची व्यापारी पेठ कमी पडत असल्याचे दिसून येते. एक किलो मिरची तोडून ती विकण्यासाठी १० रुपयांपर्यंत खर्च येतो. तथापि, बाजारात कधी क्विंटलला हजार, तर कधी ६०० रुपये भाव मिळतो. त्यामुळे तोडण्याचा खर्चही निघत नाही. पुन्हा पीक घेण्यासाठी रासायनिक खताची मात्रा द्यावी लागते. त्यासाठी एकरी पाच हजारांचा खर्च येतो. क्विंटलमागे दोन हजारांवर मिरचीला किंमत आणि रेल्वेसारख्या वेगवान मालवाहतुकीची आवश्यकता व्यक्त होत आहे.मिरचीचे तोडे थांबलेनवीन वाण अधिक तिखट असल्याने वापराला मर्यादा आहेत. त्यामुळे मागणी वाढण्याची वाट पाहत शेतकऱ्यानी मिरचीचे तोडे थांबवले आहेत. दरवर्षी जानेवारीनंतर मिरचीचे दर वाढत होते. मात्र, यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये उलंगवाडी झाल्याने भाववाढीची अपेक्षा फोल ठरणार आहे.रेल्वे लाईनची मागणीमालवाहतुकीच्या साधनांची उपलब्धता पाहून व्यापारी शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करतात. सध्या राजुराबाजार येथून रस्त्यानेच मालवाहतूक होऊ शकते. ती व्यापाऱ्यांना परवडणारी नसल्याने शेतकºयांकडे मिरची साठल्याचे दिसून येते. अमरावती-नरखेड रेल्वे मार्गाला जोडणारा रेल्वे मार्ग येथे मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मिरचीच्या नवनवीन वाणामुळे उत्पादन वाढले. त्यानुसार खर्चदेखील वाढला आहे. दोन ते अडीच हजारांपर्यंत भाव मिळाल्यास मिरची विकणे परवडणारे होऊ शकते. यासाठी सक्षम बाजारपेठ हवी आहे.- गणेश गावंडे, शेतकरी, तळणी, ता. मोर्शीप्रक्रिया उद्योगाला चालना मिळणे गरजेचे आहे. कृषिमालासाठी शीतगृहाची निर्मिती शासनाने करावी.- गोवर्धन दापूरकर, शेतकरी, अमडापूर, ता. वरूड