भातकुली नगरपंचायतीत ग्रीन मॅरेथॉन
वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली नगरपंचायत व खोलापूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने खोलापूर येथे रविवारी ‘ग्रीन रन’ स्पर्धा घेण्यात आली. एमओ अक्षय निकोसे यांनी उद्घाटन केले. भातकुली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य उपस्थित होत्या. खोलापूर-बोरखडी या मार्गावर ७.२ किलोमीटर अंतराच्या या रनिंगमध्ये देविदास सनके या युवकाने प्रथम क्रमांक पटकाविला. विशाल खेडकर व ऋषिकेश इंगळे हे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
--------------------
फोटो पी २४ चिखलदरा
चिखलदऱ्यातही धावले १५६ युवक युवती
चिखलदरा : येथे रविवारी सकाळी सात वाजता ‘ग्रीन रन २०२१’ अंतर्गत ७.२ किमी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. यात १५६ स्पर्धकांनी भाग घेतला. विजेत्यांना पारितोषिक तसेच प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार माया माने, नगराध्यक्ष विजय सोमवंशी, ठाणेदार आकाश शिंदे, सपोनि शहाजी रूपनर, विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी नगरपालिका महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी हजर होते.
-------------------------
फोटो पी २४ तिवसा
तिवसा येथे ग्रीन रनमध्ये शेकडो स्पर्धक
तिवसा: स्थानिक पोलीस ठाणे व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत ‘ग्रीन रन मॅरेथॉन’ मध्ये १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तिवसा पोलीस ठाणे ते शेंदुरजना बाजार दरम्यान धावण्याच्या या स्पर्धेत यात अभिलाष पखाले पहिला, स्वरूप भाकरे दुसरा, तर तेजस बाबरे याने तिसरा क्रमांक पटकावला. महिलांमधून आचल मनवर, आरती भालेराव व भाग्रश्री ठाकरे विजेत्या ठरल्या. पोलीस निरीक्षक रिता उईके व मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांचे हस्ते बक्षीस देण्यात आले. तहसीलदार वैभव फरतारे, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, वैद्यकीय अधीक्षक पवन मालूसरे, टीएमओ जोत्सना पोटपिटे उपस्थित होते.
-----------------------
फोटो पी २४ दर्यापूर
दर्यापुरमध्ये लखन बुंदेले प्रथम
दर्यापूर : स्थानिक पोलीस व नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ७.२ किमी अंतराच्या धावण्याच्या स्पर्धेत एकूण २८१ स्पर्धक सहभागी झाले. यात हनुमान व्यायाम क्रीडा मंडळाचा लखन बुंदेले प्रथम, अस्लम शहा द्वितीय व लक्ष्मण बायवार यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच महिलांमधून आकांक्षा वगारे, साक्षी ढवळे व साक्षी शंके या विजेत्या ठरल्या. एसडीपीओ सुनील मोरे, तहसीलदार योगेश देशमुख, ठाणेदार प्रमेश अत्राम, मुख्याधिकारी गीता वंजारी यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. संचालन अनिल भारसाकळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरपरिषदेचे राहुल देशमुख यांनी केले.
--------------------
फोटो पी २४ नांदगाव
नांदगाव खंडेश्वर येथे धावले ३५० स्पर्धक
नांदगाव खंडेश्वर : अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या ‘ग्रीन रन’ मध्ये ३५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. मुलांकरिता ७.२, तर मुलींकरिता २.५ किलोमीटरचे अंतर ठेवण्यात आले होते. अभिनव ढोके (रा. शिवणी रसुलापुर), संकेत शुक्ला (रा. मंगरूळ चव्हाळा), कुमार अडसोड (रा. टोंगलाबाद) व मुलींमध्ये निकिता चौधरी, संजना खटोले, व प्रतीक्षा भूजंगराव यादगिरे यांनी पहिले तीन बक्षीस पटकाविले. तहसीलदार पीयूष चिवडे, मुख्याधिकारी मीनाक्षी यादव, बीडीओ विनोद खेडकर, ठाणेदार गोपाल उंबरकर, सदानंद जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
----------------------
फोटो पी २४ अचलपूर
अचलपुरात ३१० जणांनी गाजविली “ग्रीन रन
परतवाडा : अचलपूर ते एलआयसी चौक परतवाडापर्यंत घेण्यात आलेल्या ग्रीन रन स्पर्धेत एकूण ३१० स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी तहसीलदार मदन जाधव, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, वैद्यकीय अधीक्षक डोले, मोहम्मद जाकीर, सरमसपुराचे ठाणेदार जमील शेख उपस्थित होते. कमलेश कोषळकर (अचलपूर), प्रथमेश गुडधे (नायगाव बोर्डी), प्रदीप कुमारिया (अचलपूर) व मुलींमधून प्रणाली गुज्जर (विलायतपूरा) प्रियंका गुज्जर (विलायत्तपुरा) व रोशनी घोडे (अचलपूर) यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविले. रोख रक्कम बक्षीस तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.
-------------