के.ए.धापके : शेतकऱ्यांनी संरक्षित शेती करावीबडनेरा : बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. कुठल्याही पिकाची शाश्वती देता येणे शक्य नाही. वाढत्या शहरीकरणाने ग्रामीण भागात मजूुरांची समस्या निर्माण झाली आहे. पारिवारिक हिस्से वटणीमुळे शेतीचे लहान लहान तुकडे झाले आहेत. त्यामुळे शेतीला लागणारा खर्च व उत्पन्न याचा मेळ घालने कठिन होत चालले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी संरक्षित शेती करावी असे आवाहन के. ए. धापके यांनी केले. कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर (बडनेरा), यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय हरितगृह तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर येथे आयोजित या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून अनिल खर्चान, उपविभागीय कृषी अधिकारी,सुनील भंडारे(पुणे), दत्तू भगत, हाईटेक कन्सल्टंट अहमदनगर कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे प्रफुल्ल महल्ले, के. पी. सिंग, योगेश महल्ले आदी उपस्थित होते.धापके पुढे म्हणाले, शेतीच्या लहान तुकड्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर व्यवस्थित करता येतो, त्यासाठी हरितगृह हे एक उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे.न् ाव्या शहरीकरणात लागणारा विदेशी भाजीपाला चांगल्या पद्धतीने निर्माण करता येवू शकतो व त्यातून चांगले उत्पन्न मिळविता येते, असेही ते म्हणाले. उदघाटनपर भाषणात अनिल खर्चान यांनी हरितगृहातीलफुल पिके, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान आणि परदेशी भाजीपाला तंत्रज्ञान याविषयी तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित केले. प्रशिक्षण कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यातील ५० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांकरीता प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रफुल्ल महल्ले यांनी केले तर सचिन पिंजरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाकरिता प्रताप जायले, विजय शिरभाते, अर्चना काकडे, संतोष देशमुख,राहुल घोगरे, किशोर अजबे,सचिन आखरे,लक्ष्मण भजभुजे, ज्ञानेश्वर जिराफे यांनी परिश्रम घेतलेत.
कृषी विज्ञान केंद्रात हरितगृह तंत्रज्ञान प्रशिक्षण
By admin | Published: August 25, 2016 12:13 AM