जिल्हाध्यक्षांच्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंत
अमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने बुधवारी जिल्हा काँग्रेसचे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी बबलू देशमुख यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. डॉ. बाबासाहेबांनी जगभरातील लोकांच्या मनावर आपल्या विचाराने, कार्याने आणि कर्तृत्वाने राज्य केले, ते युगपुरुष भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिल्याचे प्रतिपादन बबलू देशमुख यांनी केले. याप्रसंगी प्रकाश काळबांडे, हरिभाऊ मोहोड, प्रदीप देशमुख, सतीश हाडोळे, संजय वानखडे, रवींद्र गायगोले, संजय लायदे, भागवत खांडे, बिटू मंगरोळे, सिध्दार्थ बोबडे, संदीप रिठे, सुधीर देशमुख, बबलू बोबडे, नीरज कोकाटे, सतीश धांडे आदी उपस्थित होते. कारोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसतर्फे तालुकास्तरावर रक्तदान शिबिराचाही प्रारंभ करण्यात आला. सदर शिबिर २० एप्रिलपर्यंत १४ तालुक्यांत पार पडणार आहे.