------------
फोटो पी धांडे
दर्यापूरची देवश्री धांडे जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानित
दर्यापूर : ग्रामीण पोलीस दलातर्फे रक्षादीप उपक्रमांतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचार व महिलांवरील अत्याचार या संवेदनशील विषयावरील माहितीपटाला आवाज देणाऱ्या सिव्हिल लाइन येथील आठवीची विद्यार्थिनी देवश्री धांडे हिला पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, एसपी हरी बालाजी व इतर मान्यवरांच्या हस्ते तिला प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
--------
व-हा येथे महाशिवरात्री उत्सव साध्या पध्दतीने
कु-हा : तिवसा तालुक्यातील व-हा येथील श्री शंकर संस्थानमध्ये कोरोना नियमांचे पालन करून सुधाकर मलवार व मिरासे यांचे हस्ते साध्या पध्दतीने भोलेनाथाचे पुजन करण्यात आले. या महाशिवरात्री उत्सवामध्ये श्री जय भोले बाल डफडी मंडळाच्यावतीने महादेवाची आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला.
------------
सोमेश्वर मंडळात महाशिवरात्री उत्सव
अमरावती : श्री सोमेश्वर मंडळ येथे श्री सोमेश्वर मित्र मंडळातर्फे महाशिवरात्री महोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यंदा मंडळातर्फे रांगोळी काढून कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली. रांगोळीची संकल्पना व सजावट कुशल दर्यापुरकर, अर्पित शहापुरे, तेजस दर्यापुरकर, उज्वल डहाके, वेदांत चौधरी, सोमेश विटाळकर, अवि फुलंबरकर, शिवा देशमुख यांनी केली.
-----------------
निधन वार्ता
अशोक राऊत
फोटो पी १२ अशोक राऊत
पुसला : येथील डहाका वादक अशोक मारोतराव राऊत (५२) यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
--------
अजिंक्य निवासी मतिमंद विद्यालयास गालिचे भेट
अमरावती : शहरातील अजिंक्य मतिमंद शिक्षण संस्थेद्वारा संचालित अजिंक्य निवासी मतिमंद विद्यालयाला चटई व गालिचे भेट म्हणून देण्यात आले. नुकतेच डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात विदर्भ ज्ञानविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. एस. सोईतकर यांच्यातर्फे मिळालेल्या देणगीतून मॅट व गालिचे प्रदान करण्यात आले. यावेळी मेघा बोबडे, अविनाश राजगुरे, राजू डांगे, विष्णू कांबे, मधुकर डिकेपाच, विशाल शेवणे, गोविंद कासट, सुदर्शन गांग, कमल वई,उपमहापौर कुसूम साहू, प्रवीण रुद्रकार, उमेश धुमाळे, निखिल बारबुद्धे व हरिभाऊ बाहेकर इत्यादी मंडळी हजर होती.
--------------------------
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध
अमरावती : स्पर्धा परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी पंचवटी चौकात रास्तारोको केला. मात्र गाडगेनगर पोलिसांनी त्यांच्यावर लाठी हल्ला केला. त्या लाठी हल्ल्याचा वंचित बहुजन महिला आघाडीच्या निशा शेंडे, विद्या वानखेडे, पुष्पा बोरकर, सुनीता रामटेके, रत्ना गणेश, सुजाता गणेश, सुवर्णा प्रधान, वैशाली कोटांगळे यांनी जाहीर निषेध करून परीक्षा त्वरित घेण्याची मागणी केली आहे.
---------------
अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाची कार्यकारिणी
अमरावती : अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाची अमरावती जिल्हा कार्य समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या जिल्हाध्यक्षापदी योग शिक्षिका प्रियंका गोवारे यांची एकमताने निवड करण्यात आली. योग शिक्षकांच्या सर्व समस्या सोडविण्यासह योगा शिक्षकांना विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याच्या हेतूने हा महासंघ निर्माण करण्यात आला आहे.
-------
मोक्षधामात महाशिवरात्री उत्सव साजरा
कु-हा : भोगावतीच्या तिरावर नव्याने सौंदर्यीकरण करण्यात आलेली कु-हा मोक्षधाम येथे महाशिवरात्री निमित्ताने प्रथमच भगवान शंकराच्या मुर्तीची कोरोनाचे सर्व नियम पाळुन भव्य महापुजा, महाआरती करण्यात आली. महाशिवरात्री उत्सव साजरा करण्याकरिता वेलफेअर फाउंडेशनचे सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.
-------------
गणोरी येथे मास्क वाटप
गणोरी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भातकुली तालुकाध्यक्ष अमोल भारसाकळे यांनी भातकुली तालुक्यातील गणोरी या गावी मास्क व साबनाचे वाटप केले. यावेळी गावातील सरपंच अजय देशमुख, मिलिंद देशमुख, राजेंद्र घोरमोडे, नवज्योत देशमुख, आशिष ढोक, सार्थक देशमुख आदी उपस्थित होते.
--------------
पान ३ साठी