आॅनलाईन लोकमतअमरावती : समाजकल्याण विभागाच्या अनुदानित सिद्धार्थ मुलांचे वसतिगृहाची दुरवस्था आदिवासी मुलांच्या तक्रारीमुळे उघड झाली. मुलांनी तक्रार केल्यानंतर सोमवारी बाल कल्याण समितीने धाड टाकून वसतीगृहातील भोंगळ कारभार उघड केला. आदिवासी मुलांना कोणात्याही प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात नसून मुले दररोज किराणा आणून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.महाराष्ट्र शासन बोधीसत्व अशोक शिक्षण संस्थेंतर्गत चालविल्या जाणाºया सिद्धार्थ मुलांच्या वसतिगृहात पाचवी ते दहावीपर्यंतचे आदिवासी विद्यार्थी वास्तव्यास आहेत. शासन नियमावलीनुसार आदिवासी विद्यार्थ्यांना ज्या सुविधा पुरविणे अपेक्षित आहेत, त्यापैकी बहुतांश सुविधा या वसतिगृहात मिळत नसल्याची ओरड मुले करीत आहे. मुलांच्या तक्रारीनुसार वसतिगृहात अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. मुलांवर लक्ष देण्यासाठी कोणी नसते. वसतीगृहातील मुलांनाच कामे करावी लागते. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक जीवनमानावर परिणाम होत आहे. याबाबत मुलांनी बाल कल्याण समिनीकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार सोमवारी समितीचे अध्यक्ष दिलीप काळे, सदस्य माधव दंडाळे, किशोर देशमुख व हव्याप्र मंडळातील चाईल्ड लाईनचे अजय देशमुख यांनी वसतिगृहातील मुलांच्या तक्रारीचे तथ्य जाणून घेतले. घाणीचे साम्राज्यात पाण्याची सोय, झोपण्याची व जेवणाची योग्य सोय नाही आदी बाबींची समस्या बाल कल्याण समिती अधिकाºयांच्या निदर्शनास आले. वसतिगृहात सुरक्षा रक्षक नाही, सरंक्षणाच्या दृष्टीने वरच्या मजल्याला पराफीट नाही. अशी स्थितीत वसतीगृह असल्याचे निदर्शनास आले आहे. या वसतीगृहाला २६ मुलांची मान्यता आहे. मात्र, सोमवारी त्यापैकी केवळ सात जण वसतिगृहात उपस्थित असल्याचे आढळून आले आहे.सिद्धार्थ मुलांच्या वसतिगृहाची पाहणी केली असता मुलांना सुविधांचा अभाव जाणवला. याबाबत योग्य कार्यवाहीसंबंधी विभागाला प्रस्ताव पाठवू.- दिलीप काळे, अध्यक्ष, बाल कल्याण समिती
वसतिगृहातील मुले आणतात किराणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 9:52 PM
समाजकल्याण विभागाच्या अनुदानित सिद्धार्थ मुलांचे वसतिगृहाची दुरवस्था आदिवासी मुलांच्या तक्रारीमुळे उघड झाली.
ठळक मुद्देसिद्धार्थ मुलांचे वसतिगृहाची दुरवस्था उघड : बाल कल्याण समितीकडे तक्रार