शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

सकल मराठा जनांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:28 PM

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाच्या उदासीन भूमिकेचा घोषणांद्वारे निषेध करीत मंगळवारी येथील राजकमल चौकात सकाळी ११.३० वाजता कानलगाव येथील मराठा युवक काकासाहेब शिंदे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याचवेळी चौकात काही काळ ठिय्या देत बाजारपेठ शांततापूर्व बंद ठेवण्यात आली.

ठळक मुद्देसामूहिक श्रद्धांजली : जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्स्फूर्त बंद

अमरावती : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाच्या उदासीन भूमिकेचा घोषणांद्वारे निषेध करीत मंगळवारी येथील राजकमल चौकात सकाळी ११.३० वाजता कानलगाव येथील मराठा युवक काकासाहेब शिंदे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याचवेळी चौकात काही काळ ठिय्या देत बाजारपेठ शांततापूर्व बंद ठेवण्यात आली.मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर सकल मराठा जन मंगळवारी आक्रमक झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करीत सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी राजकमल चौक दणाणून गेला. काकासाहेब शिंदे या मराठा युवकाने गोदावरी नदीत जलसमाधी घेतली. यासाठी राज्याचे मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत यांच्याकडे सामुहिक तक्रारीद्वारे करण्यात आली. यावेळी राजकमल चौकात तगडा पोलीस बंदोबस्त होता.बाजारपेठ काही काळ बंदराजकमल चौकात मराठा युवक काकासाहेब शिंदे यांना सकल मराठा समाजाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्यानंतर उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांसह शासन निषेधाच्या घोषणा देत चौकात ठिय्या दिला. यावेळी चौकातील काही प्रतिष्ठान सुरू असल्याने शांततापूर्वक बंद करण्यात आलीत.चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनचांदूर रेल्वे : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे यांना आदरांजली वाहून मराठा संघटनेच्यावतीने एसडीओंना निवेदन देण्यात आले. यावेळी गजानन यादव, अर्जुन बाबर,श्रीकांत माने, संदीप जरे, उमेश बाबर, सागर गरूड, सारंग तेलकुंटे, गजानन सूर्यवंशी, विजय मिसाळ, प्रावीण्य देशमुख आदी उपस्थित होते.तिवस्यात तहसीलदारांना निवेदनतिवसा : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला तिवस्यात उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. लढा संघटना व सकल मराठा समाजाने दुपारी नायब तहसीलदारांना निवेदन सादर केले. यावेळी संजय देशमुख, वैभव वानखडे, मिलिंद देशमुख, सचिन गोरे, रोशन वानखडे, सुधीर देशमुख, योगेश लोखंडे, विलास हांडे, मुरली मदनकर आदी उपस्थित होते.दर्यापुरात मोर्चादर्यापूर : मराठा आरक्षणासाठी सकल मराठाच्यावतीने तहसीलवर मोर्चा धडकला. संभाजी ब्रिगेड मराठा, सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड, प्रहार संघटनाही सहभागी झाली होती. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी बंदोबस्ताला होती. प्रभारी उपविभागीय अधिकारी अमोल कुंभार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.बडनेऱ्यात कडकडीत बंदबडनेरा : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला बडनेऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी १० वाजता रेल्वे स्थानक चौकापासून रॅलीला सुरूवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बंदमध्ये मंगेश पवार, संकेत साबळे, किशोर पवार, नगरसेवक ललित झंझाड, अमोल जगदळे, नितीन सोळंके, मयूर जाधव, दत्ता फरताडे, शिवाजी जाधव, निखिल पवार, स्वप्निल धोटे, राजेश पोळ, अनिल चव्हाण, बंडू धामणे, प्रेम फरतोडे, राजा घोरपडे, अनिल शिंदे, पिंटू पाटील, सचिन नेवारे, रवी कदम, शशिकांत नन्नावरे आदी उपस्थित होते.मोर्शीमध्ये श्रद्धांजलीअमरावती : उपविभागीय अधिकारी मनोहरराव कडू यांना मराठा आरक्षणाबाबत निवेदन देण्यात आले. त्यापूर्वी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रवीण राऊत, संदीप रोडे, रवि मेटकर, नितीन उमाळे, हरिदास गेडाम, घनश्याम शिंगरवाडे, क्रांती चौधरी, आप्पा गेडाम, नीलेश चौधरी, सूरज विधळे, भैया टेकाडे, आकाश चिखले, विनोद कठाळे, सागर खोरगडे, अतुल भुयार, प्रमोद कानफाडे, शेखर वानखडे, सुनील भुतकर, मुकुंद राऊत, जयभारत देशमुख, अंकुश घोरमाडे आदी उपस्थित होते.