शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तळणी येथे भीषण पाणीटंचाई

By admin | Published: February 14, 2016 12:25 AM

पंचायत समितीमधील तळणी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

भटकंती : उन्हाळ्यापूर्वीच पेटला गावात पाणीप्रश्नमोर्शी : पंचायत समितीमधील तळणी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने तात्पुरती व्यवस्था केलेली विहीर आटली असून मागील १० दिवसांपासून गावातील नळयोजना बंद आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन शेतातून टाकावी लागत असून उभ्या पिकांमुळे महिनाभरापासून काम प्रलंबित आहे. पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असले तरी प्रत्यक्षात पाणी टाकीपर्यंत पोहोचण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागणार असल्याचे समजते. मागील वर्षी नव्या योजनेच्या कामाला सुरुवात झाली असली तरी पावसाळ्यानंतर सदर योजनेचे काम होऊ शकले नव्हते. मागील वर्षीही तीव्र पाणी टंचाईचा सामना तळणीकरांना करावा लागला. प्रशासकीय मंजुरातीचे अनेक अडथळे पार केल्यानंतर योजनेचे काम जेमतेम सुरू झाले होते.पाण्याचे महत्त्व समजून तातडीने मंजुरात मिळणे गरजेचे होते. त्यामुळे यावर्षी पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला नसता. गावाला नवीन योजनेचे पाणी सुरू होईपर्यंत नव्या विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव शासन दरबारात ग्रामपंचायतने सादर केला असून प्रस्ताव मंजूर होईपर्यंत नागरिकांची शेतातून पाणी आणण्यासाठी पायपिट सुरुच राहणार आहे. शेतीची मजुरीची कामे सोडून पाणी आणण्याचे काम नागरिक सध्या करत असून गावातील विहीरींचे, हातपंपाचे पाणी अत्यंत कमी झाले आहे. (शहर प्रतिनिधी)