शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

जियाउल्लाच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 6:00 AM

निवासी मदरशात शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली नागपुरी गेट पोलिसांनी संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानला मंगळवारी मध्यरात्री नागपुरातून अटक केली. बुधवारी त्याला चोख पोलीस बंदोबस्तात जिल्हा न्यायाधीश (७) तथा अपर सत्र न्यायाधीश ए.व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देफिरदौसच्या शोधात पोलीस मध्यप्रदेशात : मदरशातील मुलीचे लैंगिक शोषणाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मदरशातील मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोपी मुफ्ती जियाउल्ला खान याला न्यायालयाने आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील सहआरोपी फिरदौस नामक महिला पसार असून, तिच्या शोधात नागपुरी गेटचे पोलीस पथक मध्यप्रदेशात रवाना झाले आहे.निवासी मदरशात शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली नागपुरी गेट पोलिसांनी संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानला मंगळवारी मध्यरात्री नागपुरातून अटक केली. बुधवारी त्याला चोख पोलीस बंदोबस्तात जिल्हा न्यायाधीश (७) तथा अपर सत्र न्यायाधीश ए.व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोठडीदरम्यान पोलिसांनी त्याचे बयाण नोंदविले. त्याला मदरशातील घटनास्थळी नेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आली. सहआरोपी फिरदौसबाबत विचारणा करून तिच्या घराचा पत्ता पोलिसांनी मिळविला. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लभाने यांच्यासह पोलीस हवालदार प्रमोद गुडदे, विलास पोहोणकर, विक्रम देशमुख यांचे पोलीस पथक फिरदौसच्या अचलपूर येथील घरी पोहोचले होते. मात्र, ती मिळाली नाही. ती मध्यप्रदेशात गेल्याच्या माहितीवरून पोलीस पथक तेथे रवाना झाले. फिरदौसच्या भावालाही चौकशीसाठी पोलिसांनी बोलाविल्याची माहिती पुढे आली आहे.पोलिसांनी मदरशातील सर्व मुलींचे, त्यांच्या आई-वडिलांचे मोबाइल क्रमांक मिळविले असून, त्यानुसार स्थानिक मुलींशी व त्यांच्या आई-वडिलांशी संपर्क करून बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.दरम्यान, जियाउल्ला खानची पोलीस कोठडी शुक्रवारी संपली. त्यामुळे पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने जियाउल्ला खानच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा खटलापीडितेला न्याय व संरक्षणासाठी मुस्लिम बांधव एकवटले आहेत. शुक्रवारी मुस्लिम समाज न्यायप्रिय घटकमार्फत मोहम्मद अलीम पटेल, अन्सार बेग, रियाज पटेल, सैय्यद ऐजाज, मोहसिन खान, मोबीन खान, जावेद अहेमद खान, जुनेद खान यांच्यासह आदी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. प्रकरणाची सखोल चौकशी करा, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवा, मुलीला व तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा द्या, आरोपीसह सहआरोपींची नार्को टेस्ट करा, पीडितेस २५ लाखांची आर्थिक मदत करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.संस्था पदाधिकाऱ्यांत पत्नीचा सहभागजियाउल्ला खान अध्यक्ष असलेल्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. या घटनाक्रमामुळे जियाउल्ला खानची पत्नीदेखील चौकशीच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे.धर्मादाय आयुक्त, 'सीए'ला पत्रजियाउल्ला खान निवासी मदरसा व जोया एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष आहे. ती संस्था कायदेशीर मान्यताप्राप्त आहे का, याच्या पडताळणीसाठी पोलीस धर्मादाय आयुक्तांना पत्र देणार आहेत, शिवाय संस्थेचा आॅडिट रिपोर्टसाठी त्याच्या सीएला पत्र देतील.एका साक्षीदाराचे न्यायालयासमक्ष बयाणपीडित मुलगी व एका साक्षीदार मुलीचे कलम १६४ अन्वये न्यायालयात शुक्रवारी बयाण नोंदविले जाणार होते. मात्र, पीडित सद्यस्थितीत बयाण देण्यास असमर्थ असल्यामुळे तिचे बयाण पुढील दिवसांत नोंदविले जाणार आहे. तथापि, साक्षीदार मुलीचे बयाण न्यायालयासमक्ष नोंदविण्यात आले.न्यायालय परिसरात विरोधकांची गर्दीआरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने मुस्लिम बांधवांमध्ये रोष व्यक्त होत आहे. या धक्कादायक व गंभीर घटनेमुळे पोलिसांनीही सतर्कता बाळगली आहे. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मुस्लिम बांधव सरसावले आहेत. शुक्रवारी नागरिकांची न्यायालय परिसरात मोठी गर्दी होती.मोबाइलसह संगणक दस्तावेज जप्तपोलिसांनी गुरुवारी रात्री जियाउल्ला खानची चौकशी करून मोबाइल जप्त केला. मोबाइलचा सीडीआर काढून त्याने कुणाकुणाशी संपर्क साधला, कुणाला संदेश पाठविले, याची माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी मदरशातून कर्मचारी व मुलींचा हजेरीपट, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, हार्ड डिस्क, संगणक जप्त केला आहे.मुलींचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा शोधआरोपी जियाउल्ला खानच्या समर्थकांनी मदरशातील मुलींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. ते व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या चार जणांची नावे पुढे आली असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांनाही सहआरोपी बनविले जाण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हा