शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

हमीभावात वाढ, खासगीत मात्र लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 10:15 PM

केंद्राने यंदाच्या हंगामासाठी हमीभाव जाहीर केले असले तरी एकाही बाजार समित्यांमध्ये शेतमाल हमीभावाने विकला जात नाही. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल विकला जाऊ नये, यासाठी १९ मार्च २०११ च्या परिपत्रकान्वये सर्वच बाजार समित्यांना पणन संचालकांचे निर्देश आहेत. मात्र, यामधूनही ९ नोव्हेंबर २०१२ च्या पत्रकाचा पर्याय काढत शेतमाल नॉन एफएक्यू प्रतवारीत खरेदी केल्या जात असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देअंमलबजावणी केव्हा? : हमीदर मिळण्यासाठी यंत्रणाच सक्षम करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्राने यंदाच्या हंगामासाठी हमीभाव जाहीर केले असले तरी एकाही बाजार समित्यांमध्ये शेतमाल हमीभावाने विकला जात नाही. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल विकला जाऊ नये, यासाठी १९ मार्च २०११ च्या परिपत्रकान्वये सर्वच बाजार समित्यांना पणन संचालकांचे निर्देश आहेत. मात्र, यामधूनही ९ नोव्हेंबर २०१२ च्या पत्रकाचा पर्याय काढत शेतमाल नॉन एफएक्यू प्रतवारीत खरेदी केल्या जात असल्याचे वास्तव आहे.शासनाने आॅनलाईन नोंदणी केलेल्या ६० हजार शेतकऱ्यांची तूर, हरभरा खरेदी केलीच नाही. या सर्व शेतकऱ्यांना आता बाजार समित्यांमध्ये माल विकल्याशिवाय पर्याय नाही. या शेतमालावर शासन प्रतिक्विंटल एक हजारांचे अनुदान देणार असले तरी हमीभावापेक्षा कमी दराने माल विकलाच जाऊ नये, यासाठी व्यापाºयांच्या मुसक्या आवळण्याचे धाडसच शासनाकडे नाही. बाजार समित्यांमध्ये गुरूवारी तूर ३,४५० ते ३,७५०, मूग ४,१०० ते ४,८००, उडीद २,१०० ते २,१००, हरभरा ३,१०० ते ३,१००, सोयाबीन ३१०० ते ३३०० या भावाने विकल्या गेले, किंबहुना या वर्षभरात शेतमालास बाजार समित्यांमध्ये आधारभूत किंमत मिळाली नाही. शेतकºयांची लूट होत असताना बाजार समिती व्यवस्थापनाद्वारा एकाही व्यापाऱ्यास अटकाव केला गेलेला नाही.९ नोव्हेंबरच्या निर्देशाकडे डोळेझाकसहकार विभागाच्या ९ नोव्हेंबर २०१२ च्या परिपत्रकानुसार शेतकरी जर हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करण्याची परवानगी देत असेल तर कलम ३२ (ड) नुसार खरेदी करता येते. मात्र यासाठी बाजार समित्यांद्वारा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकाकडे पाहिजे, त्यानंतरच परवानगी मिळते. यासाठी सहा. निबंधक, तालुका कृषी अधिकारी व बाजार समितीचे सचिव यांनी आवक शेतमाल नॉन एफएक्यू प्रमाणित केल्यानंतरच लिलावास परवानगी मिळते. मात्र, याचे कोणतेही निकष न पाळता सर्व बाजार समित्यांमध्ये हमीपेक्षा कमी भावाने शेतमालाची विक्री होत असल्याचे वास्तव आहे.१९ नोव्हेंबर २०११ च्या परिपत्रकाचे उल्लंघनबाजार समिती अधिनियम १९६३ व १९६७ मधील तरतुदीनुसार सोपविलेल्या जबाबदारीमध्ये हयगय झाल्यास संचालक मंडळ व सचिव जबाबदार राहील.बाजार समितीमध्ये शेतमालाचे वजन ईलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यानेच करणे अनिवार्य आहे. याला अधिनियम १९६३ चे कलम १२ (१) अन्वये मान्यता देण्यात आली आहे.बाजार समितीच्या आवारात शेतमालाची खरेदी-विक्री हमीभावापेक्षा कमी दराने होणार नाही. उल्लंघन झाल्यास संचालक मंडळ व सचिव जबाबदार धरले जातील.हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी केल्यास बाजार समितीने तपासणी करून व्यापाऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याबाबत कार्यवाही करावी व अहवाल डीडीआर यांना द्यावा.या परिपत्रकाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित बाजार समितीविरूद्ध अधिनियम १९६३ व १९६७ मधील तरतूदीनुसार जिल्हा उपनिबंधकांनी कार्यवाही करावी.