आमदारांविरुद्ध घोषणाबाजी : गुन्हे मागे घेण्याची मागणीवरूड : मोर्शी-वरुड तालुक्याची संयुक्त आढावा बैठक आटोपून ेअमरावतीकडे परतत असताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांची गाडी बेनोडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात शेकडो शतकऱ्यांनी अडविली. पालकमंत्र्याच्या ताफा अडवून स्थानिक आमदाराविरुध्द घोषणाबाजी देखील करण्यात आली.खचलेल्या विहिरी, दव पडल्याने कापूस, तूरीचे झालेले नुकसान आणि संत्राप्रक्रिया केंद्राबाबत मागण्या शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमक्ष मांडल्या. काही दिवसांपूर्वी शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले, तेव्हा ७० शेतकऱ्यांवर पोलीस कारवाई झाली होती. ते गुन्ह मागे घेण्याचे साकडे पालकमंत्र्यांना घालण्यात आले. वरुड, मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांवर निसर्ग कोपला असताना अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जातो. तर दंडुकेशाही वापरुन खटले भरले जातात. अनुदानाचे प्रश्न प्रलंबित आहेत. अधिकारी शेतकऱ्यांचे ऐकत नाहीत, अशा अनेक समस्या यावेळी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. अती थंंडीमुळे कपाशी, तुरीवर दव पडले. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आमदारांनी या समस्येकडे लक्ष द्यायला हवे. परंतु त्यांच्याकडूून विशेष दखल घेतली जात नसल्याची तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी यावेळी पालकमंत्र्यांपुढे केली. त्यांनी सर्व समस्या ऐकून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. या सर्व समस्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासनही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.
पालकमंत्र्यांचा ताफा अडविला
By admin | Published: January 11, 2015 10:41 PM