लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत पीक कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज विनामूल्य भरण्याची प्रक्रिया सेवा केंद्राद्वारे होत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारीी अमरावती तालुक्यातील शिराळा व पुसदा या गावसह जिल्ह्यातील ३७ सेतू केंद्रांना भेटी दिल्या.कर्जमाफी योजनेतील अर्ज प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी सेतू चालकांना दिले.छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजने अंतर्गत शेतकरी बांधवांकडून सादर करण्यात येणाºया कर्जमाफी योजनेचे अर्ज भरताना येत असलेल्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. सदर अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले. शेतकरी बांधवांसोबत संवाद साधून कर्जमाफी बद्दल आश्वस्त केले. राज्यातील एकही शेतकरी कर्जमाफीतून सुटता कामा नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश असून त्याचे कठोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.ना. पोटे यांनी व्यक्तीश: कर्जमाफी प्रक्रियेवर लक्ष ठेवलेले आहे. वेळोवेळी येणाºया अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहे. जिल्ह्यातील कुठल्याही सेतू केंद्र चालकांनी शेतकरी बांधवांना पैशाची मागणी करू नये, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व निराकरणासाठी उपस्थित अधिकाºयांना निर्देश दिल. यावेळी महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अधिकारी, तहसीलदार तसेच सबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी दिल्या ३७ सेतू केंद्रांना भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:10 PM
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत पीक कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज विनामूल्य भरण्याची प्रक्रिया सेवा केंद्राद्वारे होत आहे.
ठळक मुद्देकेंद्रचालकांना तंबी : अर्ज प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश