लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील इसापूर ममदापूर शिवारात मंगळवारी अचानक पालकमंत्री प्रवीण पोटे यांना पाहून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रानडुकरांनी शेतीच्या केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.प्रत्यक्ष पालकमंत्री शेतीची धूळ अंगावर घेत शिवारात आल्याचे पाहून शेतकऱ्यांना नवलच वाटले. त्यांनी इसापूर ममदापूर शिवारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. संदीप थोटे, संजय इंगळे, विठ्ठलराव कोल्हे या शेतकऱ्यांच्या शेतात रानडुकराने केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि बोंडअळीच्या नुकसानावर मात करण्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन केले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे सांगत इसापूर ममदापूर या गावाचा आढावा घेतला आणि इसापूर या छोट्याशा गावाला भेट देऊन थेट गावकऱ्यांशी संवाद साधला व गावकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. इसापूर येथील बसफेरी राज्य परिवहन महामंडळाने बंद केल्याचे गाऱ्हाणे ग्रामस्थांनी मांडताच अमरावती येथील विभाग नियंत्रकांशी संपर्क साधून तातडीने बसफेरी सुरू करण्याचे आदेश दिले.इसापूरचे उपसरपंच संजय इंगळे, ममदापूर ग्रामपंचायतचे सदस्य संदीप थोटे, शेतकरी विठ्ठलराव कोल्हे, सुरेंद्र इंगळे, गोलू शिंदे, पिंटू देशमुख, अरविंद बोके आदी शेतकरी व गावकरी मंडळी उपस्थित होते.वनविभागाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गारनेरपिंगळाई : परिसरातील शेतात वन्यप्राणी धुमाकूळ घालून पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत वनअधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्या, तर ते शेतकऱ्यांनाच दमदाटी करीत असल्याचा आरोप होत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास १० आॅगस्ट रोजी नेर पिंगळाई येथे जाहीर सभेचे आयोजन करून शासनाविरूद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.परिसरात रोही (नीलगाय), हरिण, रानडुकरे आदी वन्य प्राणी असून कपाशी, सोयाबीन पिके नष्ट करीत आहेत. पावसानेही दडी मारल्याने पीकस्थिती चिंताजनक आहे. वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी शेतकरी रात्रीला जागरण करीत आहेत. चुकून वन्यप्राण्याला इजा झाली तर त्याचे खापर शेतकऱ्यांच्या डोक्यावर फोडून वनअधिकारी शेतकºयांना धमकातात.
पालकमंत्री पोहोेचले थेट शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 10:37 PM
लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील इसापूर ममदापूर शिवारात मंगळवारी अचानक पालकमंत्री प्रवीण पोटे यांना पाहून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रानडुकरांनी शेतीच्या केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.प्रत्यक्ष पालकमंत्री शेतीची धूळ अंगावर घेत शिवारात आल्याचे पाहून शेतकऱ्यांना नवलच वाटले. त्यांनी इसापूर ममदापूर शिवारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या ...
ठळक मुद्देरानडुकरांनी केलेल्या नुकसानाची पाहणी : इसापूर-ममदापूर शेतशिवारात दौरा