अभियान : रस्ते विकास अभियानास दर्यापूर तालुक्यातून सुरुवातदर्यापूर : तालुक्यातील अडीच हजार शेतात जाणाऱ्या परंतु अतिक्रमित असणाऱ्या पांदण रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. शेती करण्यासाठी व दळणवळणासाठी याचा मोठा लाभ होणार आहे.अभियानाला 'पालकमंत्री पांधण रस्ते विकास अभियान' असे असे नाव महसुल प्रशासनाने दिले आहे. त्याची सुरुवात दर्यापूर तालुक्यातील उमरी इतबारपुर या गावाच्या शेतशिवारातून पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते झाली. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रमेश बुंदिले, शिवसेनेचे नेते बाळासाहेब हिंगणीकर, बाजार समिती सभापती बाबाराव बरवट, भाजपचे विजय मेंढे, अनिल कुंडलवाल, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी उपस्थित होते.शेतात जाणारे पांधण रस्ते या शेतकरी बांधवांसाठी ‘लाईफ लाईन’ ्असून जलद दळणवळणासाठी शेतात जाणारे रस्ते हे विकसीत व अतिक्रमणमुक्त असणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री पोटे पांदण रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन करतांना म्हणाले. अमरावती जिल्ह्यात २५०० हजार पांदण रस्त्यांचा विकास एमआरईजीएस व लोकसहभागातून पालकमंत्री पांदण रस्ते विकास अभियान या अंतर्गत होणार आहे. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सदर अभियान परिणामकारक व विहिद वेळेत यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील तलाठी, तहसीलदार, उपविभागीय महसुल अधीकाऱ्यांची कार्यशाळा यापूर्वीच नियोजन भवनात पार पडली आहे. या अभियानामुळे २५०० हजार पांदण रस्ते मोकळा श्वास घेणार असून गतिमान शेतीसाठी याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
उमरी बाजारच्या पांदण रस्त्याची पालकमंत्र्यांनी केली पाहणी
By admin | Published: December 03, 2015 12:13 AM