लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रॅगिंग प्रकरणात त्वरेने कारवाई न करणाºया शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या संचालक अर्चना नेरकर यांनी शनिवारी गैरहजर राहून पालकमंत्र्यांचाही मान राखला नाही.पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील अश्लील आणि संतापजनक रॅगिंग प्रकरणाची गंभीर दखल घेतली. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पालकमंत्री पोलीस आयुक्तांकडून या विषयाची इत्यंभूत माहिती सतत घेत होते. शनिवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास ते स्वत: संस्थेत पोहोचले. पालकमंत्री पोहोचले तरी संस्थेच्या संचालक अर्चना नेरकर पोहोचलेल्या नव्हत्या. पालकमंत्र्यांनी त्यांच्याबाबत चौकशी केली. ‘मॅडम काल रात्री नागपूरला गेल्या होत्या. त्या रस्त्यात आहेत. एवढ्यात पोहोचतीलच.’ अशी माहिती त्यांना उपस्थित मोजक्या प्राध्यापकांपैकी एकाने दिली.या घटनेबाबत पालकमंत्री या नात्याने संस्थेच्या संचालकांनी मला फोन देखील केला नाही. संचालक या नात्याने हे त्यांचे कर्तव्य होते. रॅगिंग हा प्रकार अतिशय गंभीर असून त्याची तात्काळ दखल घेणे गरजेचे असतानाही तुम्ही मंडळींनी तशी ती घेतली नाही, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. महाविद्यालय परिसरात रॅगिंग प्रतिबंधक समितीचे फलक लावलेले नसणे हा देखील गंभीर दोष असल्याचे त्यांनी उपस्थित प्राध्यापकांना बजावले. काही वेळाने डायरेक्टर नेरकर कधी येतील, असा सवाल पालकमंत्र्यांनी पुन्हा केला. त्या रस्त्यातच आहेत. असे उत्तर उपस्थित एका प्राध्यापकाने दिले. अखेर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी कुणीतरी त्यांना फोन लाऊन त्या नेमक्या कुठे आहेत आणि किती वेळात पोहोचतील, याबाबत निश्चित माहिती पालकमंत्र्यांना द्या, असे सुचविले. पालकमंत्री सुमारे पाऊणेक तास व्हीएमव्ही परिसरात होते. पालकमंत्री निघून गेले परंतु संचालक अर्चना नेरकर शेवटपर्यंत पोहोचल्याच नाही.डायरेक्टरची वकिली करता काय?डायरेक्टरची तुम्ही वकिली करता काय? अशा शब्दात पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सांखिकी विषयाच्या प्राध्यापक आर.जी. केडिया यांना खडसावले. त्याचे झाले असे की, पालकमंत्री संस्थेत दाखल झाल्यावर त्यांनी संचालक अर्चना नेरकर कुठे आहेत असा प्रश्न केला. त्यावेळी समोर बसलेल्या केडिया यांनी त्या येत असल्याचे सांगून त्यांनी रॅगिंग प्रकरणी कशी जबाबदार कारवाई केली हे सांगण्याचा प्रयत्न केला. काही मिनीटे केडिया उधळत असलेली स्तुतीसुमने ऐकल्यावर तुम्ही डायरेक्टरची वकिली करीत आहात काय? असा संतप्त सवाल पालकमंत्र्यांनी केला. अत्यंत गंभीर विषयात अखेरच्या टप्प्यातही प्राध्यापकवर्ग इतका सहज आणि बेजबाबदार कसा वागू शकतो, याचा संताप पालकमंत्र्यांना आला होता.दोन वर्षांची शिक्षा आणि १० हजारांचा दंडरॅगिंगविरोधी कायद्याच्या ज्या कलमांतर्गत सहा मुलींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, त्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची तरतूद कायद्यात आहे. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील रॅगिंग प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सहा मुलींविरुद्ध पोलिसांना बळकट पुरावे उपलब्ध झाले आहेत. सर्वच मुलींचे बयाण गुन्हा घडल्याचे स्पष्ट करणारे आहे. पोलिसांच्या तपासातील दस्तऐवज आणि पुरावे जितके मजबूत असतील, अधिकाधिक शिक्षा होण्याची शक्यता तितकी जास्त असते.त्या मुली आईवडिलांच्या स्वाधीनरॅगिंग करणाºया पाच मुलींना पोलिसांनी सायंकाळी जामीन देऊन आई-वडिलांच्या स्वाधीन केले. मुलींनी चौकशीसाठी वेळोवेळी हजर राहणे अनिवार्य राहील, या अटीवर मुलींना जामीन देण्यात आला.पोलिसांचे युजीसीच्या गाईडलाईन्सवर लक्षरॅगिंगच्या प्रतिबंधासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) सन २००९ मध्ये काढलेल्या अधिसुचनेतील मार्गदर्शक तत्वानुसार व्हीएमव्ही संस्थेने अंमलबजावणी केली का, याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यासंबधाने संचालिकेची चौकशी पोलीस करणार आहे.
पालकमंत्र्यांचाही राखला नाही मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 11:33 PM
रॅगिंग प्रकरणात त्वरेने कारवाई न करणाºया शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या संचालक अर्चना नेरकर यांनी शनिवारी गैरहजर राहून पालकमंत्र्यांचाही मान राखला नाही.
ठळक मुद्देमुलींनी सांगितली आपबिती : मंत्री आले, चौकशी केली अन् गेलेही, डायरेक्टर मात्र पोहोचल्याच नाहीत !