बाजारपेठ सज्ज : विविध रंगांचे गुलाब बाजारात विक्रीस उपलब्धसंदीप मानकर अमरावती‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे प्रेमाचा दिवस. तंत्रज्ञानाच्या युगातही आवडत्या गुलाबाला या दिवशी तेवढेच महत्त्व. प्रियकर-प्रेयसीला प्रेम व्यक्त करताना सर्वात जवळचा म्हणजे गुलाब. पण या दिवशी गुलाबाचे भाव वधारले आहे. विविध प्रकारच्या प्रजातीचे गुलाब बाजारपेठेत विक्रीस आले आहे. ऐरवी ५ ते १० रुपयाला मिळणारा गुलाब व्हॅलेंटाईन डे ला १५ ते २० रुपयाला विकले जाणार आहे. नाशिक, पुणे येथून अंबानगरीत विक्रीस आलेल्या टवटवीत ‘उच्च’ प्रजातीच्या गुलाबाला सर्वाधिक मागणी आहे. यलो, पिंक, रेड, राणी कलर, व्हाईट, फिक्कट गुलाबी, आॅरेंज आदी रंगांमध्ये हा गुलाब विक्रेत्यांनी विक्रीस ठेवला आहे. शिर्डीवरून खास शिर्डी गुलाब बाजारपेठेत आला आहे. तसेच अहमदनगरचा साधा गुलाबही आहे. बेंगलोर येथून आलेले भॉकेडे पर्पल फुलांनाही विशेष मागणी असते. अंबानगरीत होलसेल फुले विक्रेत्यांची १३ दुकाने असून २५० ते ३०० किरकोळ फुले विक्रेत्यांची दुकाने आहेत. त्यामुळे फुले विक्रेत्यांना रविवार व्हॅलेंटाईन डे सुगीचा दिवस लाभणार असून यातून लाखो रुपयांची उलाढाल होणार आहे. (प्रतिनिधी)
‘व्हॅलेंटाईन डे’ला गुलाबाची वाढती मागणी
By admin | Published: February 14, 2016 12:23 AM