शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

अमरावतीत झोपडपट्टीदादांचे ‘गुंडाराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:00 PM

शहरातील काही परिसरात झोपडपट्टीदादांचा गुंडाराज असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री महाजनपुऱ्यात काही गुंडांनी हैदोस घालत एका घरात शिरून तोडफोड केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दसरा मैदानामागील कृष्णार्पण कॉलनी चौकात गुंडगिरी प्रवृत्तीतूनच गुंडानी हैदोस घातला. या घटनांमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

ठळक मुद्देमहाजनपुऱ्यात तणावाची स्थिती : कृष्णार्पण कॉलनी चौकातही एक घटना, खोलापुरी गेट पोलिसांनी केली तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील काही परिसरात झोपडपट्टीदादांचा गुंडाराज असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री महाजनपुऱ्यात काही गुंडांनी हैदोस घालत एका घरात शिरून तोडफोड केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दसरा मैदानामागील कृष्णार्पण कॉलनी चौकात गुंडगिरी प्रवृत्तीतूनच गुंडानी हैदोस घातला. या घटनांमुळे परिसरात दहशत पसरली आहे.महाजनपुºयात १० जानेवारी रोजी नीलेश वाघमारे यांच्यावर काही तरुणांनी चाकुहल्ला चढविला. त्यात नीलेश गंभीर झाला. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी चार ते पाच तरुणांविरुद्ध भादंविच्या कलम ३२६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. मात्र, आरोपी मोकाट असल्याने दहशत कायम आहे. त्यातच शुक्रवारी रात्री महाजनपुरा परिसरात काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी गणेश भीमराव कलाने यांच्या घरावर हल्लाबोल केला. त्यांनी कलाने यांच्या घरात शिरून साहित्याची फेकफाक केली. टीव्ही, खुर्चा, दारे, आलमारीची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर गुंडांनी कलाने यांच्या कुटुंबातील सदस्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.घटनेच्या माहितीवरून खोलापुरी गेटसह अन्य ठाण्यांच्या ताफ्यासह क्यूआरटीच्या ताफ्याने घटनास्थळ गाठले. महाजनपुºयात पोलिसांच्या ताफ्याने शुक्रवारी रात्री तळ ठोकला होता. पोलिसांनी तणावाची स्थिती हाताळली.दरम्यान, शनिवारी खोलापुरी गेटचे ठाणेदार अतुल घारपांडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.कर्फ्यूसदृश स्थितीमहाजनपुरा परिसरात गुंडांचा हैदोस वाढला असून, नागरिक दहशतीत आले आहेत. नागरिकांनी घरातून बाहेर निघणेही बंद केले होते. गुरुवारी व शुक्रवारी रात्री घडलेल्या गंभीर घटनेनंतर पोलिसांचा मोठा ताफा या परिसरात तैनात करण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी रात्री या परिसरात कर्फ्यूसदृश स्थिती होती. रस्त्यावर एकही व्यक्ती नव्हती. एक मद्यपी रस्त्यावर येऊन पोलिसांशी हुज्जत घालताना आढळून आला. मात्र, त्यालाही चोप देऊन घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला.कृष्णार्पण कॉलनीतही गुंडाचा धुमाकूळदसरा मैदानामागील कृष्णार्पण कॉलनी चौकातच मांडवा नावाची अनधिकृत झोपडपट्टी वसली आहे. या झोपडपट्टीत गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचा वावर आहे. याशिवाय अवैध दारू व्यवसायांसह गुंडगिरीचे प्रमाणही वाढले आहे. शुक्रवारी रात्री काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी मद्यपान करून तेथील पानटपरीचालकाशी दादागिरी करीत उधारीत सिगारेट मागितली. त्याने नकार दिल्यानंतर मद्यपींनी वाद घातला तसेच तलवार काढून पानटरीचालकावर चालविली. मात्र, सुदैवाने ती लागली नाही. त्यानंतर पानटपरीचालकाचे समर्थक व गुंडांमध्ये हाणामारी झाल्याने गोंधळ उडाला. रात्री ९ वाजताच कृष्णार्पण कॉलनीत चौकातील सर्व व्यावसायिकांनी आपआपली दुकाने बंद केली. गेल्या अनेक दिवसांपासून कृष्णार्पन कॉलनी चौकात दहशतीचे वातावरण आहे. या घटनेत कामेश जनार्दन नितनवरे, रूपेश सोळंके यांच्यासह पानटपरीचालक योगेश रामभाऊ पुराम जखमी झाला आहे. राजापेठ पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हा नोंदविला आहे.झोपडपट्टीदादा कायद्यान्वये कारवाई कराआमलेवाडी स्थित महाजनपुरा परिसरात अजय भगवान पाटील, शिवा शेषराव सरदार, निशांत दिलीप इंगळे, गोचू यांच्यासह अनेक जण अवैध दारू व्यवसायाच्या बळावर गुंडगिरी करतात. त्यांनी गणेश कलाने यांच्या घरावर हल्ला करून साहित्याची तोडफोड केली तसेच परिसरात खुलेआम तलवारी काढून नागरिकांमध्ये दहशत पसरवित असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात तेथील नागरिकांनी शनिवारी पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून या गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांविरुद्ध झोपडपट्टीदादा कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी निवेदनाची एक प्रत गृहराज्यमंत्री, पालकमंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांनीही पाठविली आहे. यावेळी बाली वानखडे, सुनीता हिवराळे, कौशल्या कलाने, शांताबाई वाघमारे, मंगला इंगोले, शांता कलाने, सखुबाई खडसे, पूजा कलाने, अनिता कलाने, सरला स्वर्गे आदी महिला व पुरुष पोलीस आयुक्तालयासमोर गोळा झाले होते.