शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
3
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
4
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
5
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
6
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
7
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
8
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
9
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
10
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
11
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
12
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
13
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
14
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
15
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
16
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
17
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
18
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
19
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
20
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...

सायबर टीमकडून गुडगावातील एटीएमची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 11:13 PM

स्टेट बँक आॅफ इंडियाचे खातेदारांचे पैसे चोरणाºया आरोपीच्या शोधात अमरावतीची सायबर टीम हरियाणा राज्यातील गुडगावात पोहोचली आहे.

ठळक मुद्देएसबीआय खातेदारांचे फसवणूक प्रकरण : परस्पर पैसे काढले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्टेट बँक आॅफ इंडियाचे खातेदारांचे पैसे चोरणाºया आरोपीच्या शोधात अमरावतीची सायबर टीम हरियाणा राज्यातील गुडगावात पोहोचली आहे. रविवारी पोलिसांनी काही एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली होती. त्यामुळे आता लवकरच खातेदारांचे पैसे चोरी करणाºयाचा शोध लागण्याचे चिन्ह दिसू लागले आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरातील एसबीआय खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याच्या १५ घटना पुढे आल्या आहेत. बँक खातेदारांच्या खात्यातून जवळपास १० लाखांची रोख सायबर गुन्हेगारांनी काढून घेतली. यामध्ये सर्वाधिक खातेदार एसबीआयचे आहेत. एसबीआयच्या एटीएमची सुरक्षा वाºयावर असल्यामुळे गुन्हेगारांनी स्किमर व कॅमेºयाच्या सहाय्याने थेट एटीएममधून खातेदारांची माहिती मिळविली आहे. त्या माहितीच्या आधारे एटीएम क्लोनिंग करून रोखीची चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात सायबर सेलच्या पोलिसांनी जिल्हाभरातील काही एटीएमचे सीसीटीव्ही फुटेजची तपासले. मात्र, अद्यापही गुन्हेगारांचा शोध लागला नाही. ज्या खातेदारांची फसवणूक करण्यात आली, त्यांची रक्कम ही हरियाणातील गुडगावातून विड्रॉल झाल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलचे पोलीस अधिकारी व कर्मचारी शनिवारी गुडगावकरिता रवाना झाले. रविवारी पोलीस गुडगावात पोहोचले असून त्यांनी गुडगावातील काही एटीएमची सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. आता या प्रकरणातील तपासाला गती मिळाली असून एपीआय कांचन पांडे नेतृत्वात संग्राम, सुभाष पाटीलसह अन्य पोलीस या प्रकरणाविषयी तपास करीत आहेत.एटीएमची सुरक्षा वाºयावरस्टेट बँक आॅफ इंडियाचे विभागात ६०, तर शहरात जवळपास १५ एटीएम आहेत. मात्र, बहुतांश एटीएमची सुरक्षा वाºयावरच आहे. क्वचितच एटीएमवर सुरक्षा रक्षक आहेत.स्टेट बँकेच्या दुर्लक्षामुळेच खातेदारांची माहिती मिळविण्यास गुन्हेगारांना यश आले आहे. सुरक्षारक्षक नसणाºया एटीएममध्ये गुन्हेगारांनी स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती गोळा केल्याचे पोलीस चौकशीत पुढे येत आहे. एटीएममध्ये स्कार्प बांधून नागरिक पैसे काढण्यासाठी जातात, अशा प्रकारामुळेच सायबर गुन्हेगारांना बळ मिळत आहे.बँकांचे आवाहनएटीएम कार्ड नंबर किंवा पिन नंबर बदलत राहावे, व्यवहार पूर्ण झाल्याची सूचना मिळाल्यावरच एटीएममधून बाहेर पडावे. बँकेसंबंधी माहिती विचारणारे फोन आल्यास माहिती देऊ नका, सायबर सेलशी संपर्क साधा, असे आवाहन बँक अधिकाºयांनी केले.एटीएम क्लोनिंग गुन्ह्यांची पालकमंत्र्यांकडून दखलएटीएम क्लोनिंगद्वारे होणाºया फसवणूक प्रकरणात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गंभीर दखल घेत तत्काळ कारवाईचे निर्देश पोलिसांना दिलेत. यासंदर्भात शासकीय विभागाची आढावा बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. एटीएम क्लोनिंगच्या फसवणूक प्रकरणात बँका काय कारवाई करीत आहे, याचा आढावा घेतला व अशा घटना रोखण्याचे सक्त निर्देश दिले.पैसे परत करण्याची जबाबदारी बँकेचीएसबीआयच्या खातेदारांनी माहिती न देताच परस्पर खात्यातून पैसे काढले जात आहे. खातेदारांच्या पैशांची सुरक्षा ही बँकेची जबाबदारी असून खातेदारांचे चोरी गेलेले पैसे परत देण्याची जबाबदारीही बँकेचीच आहे.एसबीआयचे 'क्विक अ‍ॅप्लिकेशन' उपलब्धस्टेट बँक आॅफ इंडियाकडून अशा घटना रोखण्यासाठी एसबीआय क्विक ही अ‍ॅप्लिकेशन खातेदारांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या अ‍ॅप्लिकेशनद्वारे बँक खातेदारांना एटीएम सुरू किंवा बंद करता येणार आहे. पैसे काढल्यानंतर या अ‍ॅप्लिकेशनद्वारे एटीएम बंद करून ठेवता येणार आहे.