अमरावती : अन्न व प्रशासन विभागाने वर्षभर धाडसत्र राबवून २२७ अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांची तपासणी केली. त्यापैकी ५७ ठिकाणी गुटखा सापडला. एफडीएने वर्षभरात ६३ लाख ५९,३१७ रुपयांचा अवैध गुटखा पकडला.
एफडीएने ५७ प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे, तर ३६ प्रकरणात खटलेसुद्धा दाखल केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. राज्यात सर्वत्र गुटखाबंदी असतानाही जिल्ह्यात सर्वत्र गुटखाविक्री करण्यात येत आहे. अशा गुटखा विक्रेत्यांवर एफडीएची नजर आहे. त्यामुळे १ एप्रिल २०२०ते ३१ मार्च २०२१ दरम्यान अन्न व प्रशासन विभागाने २२७ ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५७ ठिकाणी लाखो रुपयांचा अवैध गुटखा आढळून आला. ही कारवाई अन्न प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे, सहायक आयुक्त शरद कोलते यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली आहे. या कारवाईत जिल्ह्यातील पोलिसांचीसुद्धा मदत मिळाली.