चांदूर रेल्वे : शहरात अवैधरीत्या विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीच्या दुकानावर धाड टाकून मुद्देमाल जप्त केला आणि एका आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलिसांनी ९ मे रोजी दुपारी २ वाजता केली.
चांदूर रेल्वे शहरातील शिवाजीनगरातील रहिवासी आरोपी गणेश नारायण माहुलकर (४३) याच्या घरी असलेल्या दुकानात प्रतिबंधित गुटखा असल्याच्या गुप्त माहितीवरून रविवारी पोलीस जमादार शिवाजी घुगे, ना.पो.कॉ. विनोद वासेकर, पो.कॉ. शुद्धोधन उमाळे, महिला पोलीस आरती कुंजेकर, चालक जगदीश राठोड यांनी धाड टाकली. घरातील दुकानाची झाडाझडती घेतली असता, आरोपी गणेश माहुलकर याच्या घरातील दुकानातून महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखु अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आला. सुगंधित तंबाखु, गुटखा पान मसाला, स्वीट सुपारी असा एकुण ७ हजार ५७ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी गणेश माहूलकर याला ताब्यात घेतले होते. आरोपीविरूध्द भादंवी कलम १८८, २७२, २७३ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
चांदूर रेल्वे शहरातील शिवाजीनगरातील रहिवासी आरोपी गणेश नारायण माहुलकर (४३) याच्या घरी असलेल्या दुकानात प्रतिबंधित गुटखा असल्याच्या गुप्त माहितीवरून रविवारी पोलीस जमादार शिवाजी घुगे, ना.पो.कॉ. विनोद वासेकर, पो.कॉ. शुद्धोधन उमाळे, महिला पोलीस आरती कुंजेकर, चालक जगदीश राठोड यांनी धाड टाकली. घरातील दुकानाची झाडाझडती घेतली असता, आरोपी गणेश माहुलकर याच्या घरातील दुकानातून महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचे निदर्शनास आले. सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाला, स्वीट सुपारी असा एकूण ७ हजार ५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी गणेश माहुलकर याला ताब्यात घेतले. आरोपीविरुध्द भादंविचे कलम १८८, २७२, २७३ अन्वये गुन्हा दाखल केला.