शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:59 AM

जिल्ह्यात संततधार पावसाने पाचव्याही दिवशी सूर्यदर्शन झालेले नाही. मेळघाटसह चांदूरबाजार तालुक्यात पावसाचा कहर अद्याप सुरू आहे. सर्व तालुक्यांमध्ये सरासरी २७.२ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये धारणी तालुक्यासह सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

ठळक मुद्देभिंती कोसळल्याने सात जखमी : ५० वर घरांची पडझड, पंचनामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात संततधार पावसाने पाचव्याही दिवशी सूर्यदर्शन झालेले नाही. मेळघाटसह चांदूरबाजार तालुक्यात पावसाचा कहर अद्याप सुरू आहे. सर्व तालुक्यांमध्ये सरासरी २७.२ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये धारणी तालुक्यासह सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. दरम्यान पावसाने बाधित घरांचे पंचनामे तलाठ्यांद्वारे करण्यात येत आहेत.जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने झड लावली आहे. काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. या पाच दिवसांत तीन तालुक्यांसह २५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली, तर जिल्ह्याच्या सरासरी पावसामध्ये २२६ ते चार दिवसांत ३३७ मिमी अशी वाढ झालेली आहे. तरीही अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ८० मिमीने पाऊस माघारलेला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २७.२ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ७३ मिमी पाऊस धारणी तालुक्यात झाला. चिखलदरा ५१.६ मिमी, अमरावती २७.३ मिमी, भातकुली १०.८ मिमी, नांदगाव १६.८ मिमी, चांदूर रेल्वे २१.२ मिमी, धामणगाव रेल्वे २४.३ मिमी, तिवसा २०.९ मिमी, मोर्शी २४.९ मिमी, वरूड २६.३ मिमी, अचलपूर १९.६ मिमी, चांदूरबाजार ४७.१ मिमी, दर्यापूर ९.९ मिमी, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ७.३ मिमी अशी नोंद झालेली आहे.४३ तासानंतर मिळाला आदित्यचा मृतदेहअंजनगाव सुर्जी : नजीकच्या शहानूर प्रकल्पस्थळी हौसेखातर मासळी पकडण्यास गेलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ४३ तासानंतर मंगळवारी दुपारी मिळाला. आदित्य शांताराम कलबागे (२२, आनंदनगर, ता दर्यापूर) मृत तरुणाचे नाव आहे. २८ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आदित्य शहानूर प्रकल्पात वाहून गेला होता. महसूल, पोलीस व अन्य यंत्रणेच्या वारंवार पाठपुराव्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक सोमवारी सायंकाळच्या सुमारास शहानूर प्रकल्पावर पोहोचले. घटनेच्या २४ तासानंतर बचाव पथक आल्याने मृताचे कुटुंबीय व अन्य प्रत्यक्षदर्शींनी संताप व्यक्त केला. दरम्यान पावसाचा वाढता जोर व प्रकल्पातील जलसाठा वाढू लागल्याने सोमवारी रात्री ८.३० वाजता बचावकार्य थांबविण्यात आले. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास गाळात फसलेल्या आदित्यच्या मृतदेहाला नदीपात्राबाहेर काढण्यात आले. नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. त्यानंतर आदित्यचा मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

टॅग्स :Rainपाऊस