शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

विदर्भातील उत्तर भागात गारपीट? हवामानतज्ज्ञांचा अंदाज, दक्षिण भारतात पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 5:40 PM

हिवाळा संपला; आता काही दिवसांत कडक उन्हाच्या झळा वैदर्भीयांना सोसाव्या लागतील. मात्र, त्यापूर्वी येत्या ११ फेबु्रवारीपर्यंत वातावरणात बदल घडून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अमरावती : हिवाळा संपला; आता काही दिवसांत कडक उन्हाच्या झळा वैदर्भीयांना सोसाव्या लागतील. मात्र, त्यापूर्वी येत्या ११ फेबु्रवारीपर्यंत वातावरणात बदल घडून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विदर्भाच्या उत्तर भागात हलक्या पावसासह गारपीट होणार असल्याचा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे.    हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी केलेल्या भाकितानुसार, हिमालयाच्या उत्तर भागात पश्चिमी चक्रवात सक्रिय असून, पंजाब व हिमालयीन पश्चिम बंगालवर चक्राकार वारे वाहत आहेत. कर्नाटक किनारपट्टीवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून, तेथेही चक्राकार वारे वाहत आहेत. नैऋत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे सक्रिय आहेत. हिमालयाकडून येणारे थंड वारे तसेच पूर्वेकडील बाष्पयुक्त वारे यांच्या संयुगाने उत्तर भारतातील थंडीची लाट लोप पावली आहे. त्या अनुषंगाने रात्रीचे तापमान २ ते ३ अंश सेल्सीअसने वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात बाष्पाचा पुरवठा वाढल्याने महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण  झाले आहे. या परिस्थितीमुळे मंगळवारपासून दक्षिण भारतात पावसाची शक्यता असून, किमान तापमानात वाढ होणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या दक्षिण-पश्चिम भागात ७ फेब्रुवारी रोजी वातावरण ढगाळ राहील, तर काही ठिकाणी पाऊस पडेल. ८ व ९ फेब्रुवारी रोजी किमान तापमान १५ ते १६ डिग्री, तर कमाल तापमान ३३ ते ३५ डिग्रीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिवसांत उन्हाचा प्रभाव अधिक जाणवेल, तर किंचित ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना थोडा दिलासाही मिळणार आहे. १० फेब्रुवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस, तर ११ फेब्रुवारी रोजी विदर्भाच्या उत्तर भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. विखुरलेल्या स्वरुपात पाऊसही राहण्याचे संकेत बंड यांनी दिले आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला दरवर्षी पावसाचे वातावरण निर्माण होते. यंदा तर गारपिटची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 

या ठिकाणी गारपिटीची शक्यतापूर्व मध्य प्रदेश, सातपुड्याचा पायथा, परतवाड्याचा वरचा भाग, मोर्शी, वरुड, काटोल, गोंदिया या भागांमध्ये तुरळक पाऊस व गारपीट होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र