लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी मंडळात दुपारी वादळी पावसासह गारपीट झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे आस्मानी संकटाने मोठे नुकसान झाल. माधान येथे वीज पडून गाय दगावली.रविवारी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास अचानक सुटलेल्या वाºयामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरलेले कांद्याचे पीक झोपून गेले. यावर वादळी पावसासह गारपीटमुळे ब्राम्हणवाडा थडी मंडळातील ब्राम्हणवाडा थडी, माधान, गणोजा, काजळी गावातील शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले.घरावरील छत उडालेजसापूर या गावातील नागरिकांच्या घरावरील छत उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. ब्राम्हणवाडा थडी मंडळात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात डौलात उभे होते, हे पीक काही दिवसात शेतकºयांच्या हातात येणार तोच अस्मानी संकटाने त्यावर आघात केला. अचानक झालेल्या वादळी पावसासह गारपीटमुळे तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी तलाठी व मंडळ अधिकाºयांना तातडीने पंचनामे करून नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहे.या गारपीटचा सर्वाधिक फटका ब्राम्हणवाडा थडी मंडळाला बसला असून, महसूल विभागाकडून पाहणी झाल्यानंतर नुकसानीचा अधिकृत अहवाल प्राप्त होईल तेव्हाचे पिकाचे व इतर नुकसानीबाबत अधिकृत माहिती कळेल, असे तहसीलदारांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.काटकुंभ परिसराला अवकाळी वादळाचा तडाखाचिखलदरा : तालुक्यातील काटकुंभ परिसराला रविवारी सायंकाळी ४.३० वाजता अचानक वादळाचा तडाखा बसला. यात आंब्याचे प्रचंड नुकसान झाले. काही घरांची, शाळा, वसतिगृहाचे छप्पर उडाले. काटकुंभ व परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्याने शेतातील आंब्याचे नुकसान झाले. जि.प. आदिवासी वसतिगृह झामरू मोरे, शेख शरीफ अशोक मालवीय, मुंसा आठवले आदींच्या घराचे छप्पर उडाले. वादळाने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
वादळी पावसासह गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:12 PM
तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी मंडळात दुपारी वादळी पावसासह गारपीट झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे आस्मानी संकटाने मोठे नुकसान झाल. माधान येथे वीज पडून गाय दगावली.
ठळक मुद्देकांदा उद्ध्वस्त : माधान येथे वीज पडून गाय दगावली